Pune Crime: एक पैज, एक बॉटल अन् मृत्यूचा थरार; मित्रांच्या उरमटपणाने तरुणाचा बळी, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Last Updated:

पैज लावून मित्राला दारू पाजणं दोन मित्रांना चांगलंच महागात पडलं आहे. मित्रांनी प्रमाणापेक्षा जास्त दारू पाजल्यामुळे तरूणाचा मृत्यू झाला आहे.

Pune Crime: एक पैज, एक बॉटल अन् मृत्यूचा थरार; मित्रांच्या उरमटपणाने तरुणाचा बळी, पुण्यातील धक्कादायक प्रकार
Pune Crime: एक पैज, एक बॉटल अन् मृत्यूचा थरार; मित्रांच्या उरमटपणाने तरुणाचा बळी, पुण्यातील धक्कादायक प्रकार
पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दोन मित्रांनी पैज लावून मित्राला दारू पाजणं चांगलंच महागात पडलं आहे. मित्रांनी जास्त दारू पाजल्यामुळे तरूणाच्या जीवावर बेतलं आहे. त्यामुळे तरूणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना थर्टीफर्स्टच्या दरम्यान घडली असून त्या दोन्हीही मित्रांवर तळेगाव एमआयडीसी पोलीस स्थानकांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 30 डिसेंबर 2025 रोजी मावळ तहसीलमधील नवलाख उंब्रे गावातील एका शेतात घडली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा विचित्र चॅलेंज देणाऱ्या मित्रांचा उमरटपणा स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.
प्रकरण काय?
नवलाख उंब्रे गावामध्ये एका शेतात काही मित्रांनी एक सहज पैज लावली होती. 750 ml देशी दारूची बॉटल एका घोटात संपवायची, असं चॅलेंज रामकुमार साह (35) नावाच्या तरूणाला त्याच्या मित्रांनी दिली. चॅलेंज जिंकण्यासाठी रामकुमारने एका दमात दारू पिण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु त्याला ते चॅलेंज चांगलंच महागात पडले असून त्या तरूणाला आपला जीव गमवावा लागला आहे. प्रमाणाच्या बाहेर दारू पिल्यामुळे राम आजारी पडला. त्याच्या मित्रांनी त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायचं सोडून त्याला शेतातच सोडून तिथून पळ काढला. एका दमात बॉटल पिल्यामुळे अचानक त्या तरूणाची तब्येत बिघडली. त्यामुळे त्याला आपले प्राण गमवावे लागले.
advertisement
पुरावे नष्ट करण्यासाठी काय केले?
जास्त प्रमाणात रामकुमारने दारू प्यायल्यामुळे त्याला वैद्यकीय उपचाराची गरज होती. परंतू त्याला ते न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. धक्कादायक गोष्ट म्हणजे, संशयितांनी गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावली. रामकुमार साहला बळजबरीने दारू पाजणाऱ्या दोन मित्रांचं नाव, कृष्णा सिंह (35) आणि विकास कुमार असं आहे. कृष्णा आणि विकासविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. तळेगाव एमआयडीसी पोलीस स्थानकांत या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रामकुमार, कृष्णा आणि विकास हे तिघंही बिहारचे रहिवासी असून ते पुण्यात तळेगाव एमआयडीसीमध्ये नोकरीला होते. या घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांनी दिली आहे.
advertisement
पोलिसांत गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारू पिऊन झाल्यानंतर रामचे सर्व मित्र तिथून फरार झाले. बुधवारी (31 डिसेंबर) शेतातून दुर्गंधी येत असल्यामुळे तिथल्या स्थानिकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी शेताचा पंचनामा केला असता त्यांना राम मृतावस्थेत आढळून आला. बुधवारी रात्री पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला. तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी गुरूवारी सकाळी दोन्हीही आरोपींना बेड्या ठोकल्या. भादवि कलम 105 (खून न करता सदोष मनुष्यवधाची शिक्षा), 238 (गुन्ह्याचा पुरावा नष्ट करणे किंवा गुन्हेगाराला वाचवण्यासाठी खोटी माहिती देणे) आणि 3(5) (सामान्य हेतूने अनेक व्यक्तींनी केलेली कृत्ये) या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Pune Crime: एक पैज, एक बॉटल अन् मृत्यूचा थरार; मित्रांच्या उरमटपणाने तरुणाचा बळी, पुण्यातील धक्कादायक प्रकार
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement