#ParikshaPeCharcha या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी विचार मांडावेत-पं.नरेंद्र मोदींचे आवाहन
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या #ParikshaPeCharcha कार्यक्रमात ते #ExamWarriors विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून, परीक्षेचा ताण कसा दूर करावा यावर मार्गदर्शन करतील.
दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा परीक्षा पे चर्चा या आपल्या बहुप्रतिक्षित वार्षिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत.
देशातील सर्व #ExamWarriors नी (परीक्षा योद्ध्यांनी) आपले प्रश्न, कल्पना आणि इतरांना प्रेरणा देऊ शकतील असे अनुभव सामायिक करावेत असे आवाहनही पंतप्रधानांनी केले आहे.
या संदर्भात पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश:
दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा जवळ येत आहेत आणि त्याचबरोबर या वर्षाची #ParikshaPeCharcha देखील!
परीक्षेचे विविध पैलू, विशेषतः परीक्षेचा ताण कसा दूर करावा, शांत आणि आत्मविश्वासाने कसे राहावे आणि परीक्षांना हसत सामोरे जावे, या विषयांवर विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी मी उत्सुक आहे.
advertisement
मला या #ExamWarriors चे प्रश्न आणि त्याबरोबरच इतरांना प्रेरणा देऊ शकणारे त्यांचे अनुभव ऐकायला आवडतील.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 5:22 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
#ParikshaPeCharcha या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी विचार मांडावेत-पं.नरेंद्र मोदींचे आवाहन










