अजितदादांना नडणाऱ्या अंजना कृष्णांची आता अग्निपरीक्षा, माजी पोलीस आयुक्त असं का म्हणाले?

Last Updated:

राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडता ठाम भूमिका घेणे गरजेचे आहे. अंजना कृष्णा यांनी दाखवलेले धैर्य ही पोलीस सेवेच्या सन्मानाची बाब आहे, असे माजी आयुक्त म्हणाले.

ajit Pawr krishna
ajit Pawr krishna
सोलापूर :   करमाळा तालुक्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील फोन संभाषणाचा रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात आणि पोलीस खात्यात चांगलाच खळबळ माजली आहे. या रेकॉर्डिंगमध्ये अंजना कृष्णा यांनी अजित पवारांना दिलेल्या थेट आणि स्पष्ट उत्तरांमुळे त्या चर्चेत आल्या. त्यानंतर त्यांच्या धाडसी भूमिकेचे कौतुक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर होत आहे.  त्यानंतर आता माजी मुंबई पोलीस आयुक्त डी. शिवानंदन यांनी देखील  अंजना कृष्णा  यांचे कौतुक केले आहे.
या प्रकरणावर आता माजी मुंबई पोलीस आयुक्त डी. शिवानंदन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  त्यांनी सांगितले की, पोलीस खात्यातील अधिकारी जेव्हा कायदेशीर कारवाई करतात, तेव्हा राजकीय दबाव येणे ही काही नवीन गोष्ट नाही. “राजकीय दबाव असतोच, पण त्याला कसे हाताळायचे हे महत्त्वाचे आहे. अंजना कृष्णा यांनी दाखवलेला धाडसपूर्ण दृष्टिकोन ही त्यांची खरी अग्निपरीक्षा आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांच्यासोबत DGP, CP आणि संपूर्ण पोलीस यंत्रणा उभी आहे,” असे मत शिवानंदन यांनी व्यक्त केले.
advertisement

काय म्हणाले माजी आयुक्त?

आपल्या कारकिर्दीतही स्वतःवर अशाच प्रकारचा राजकीय दबाव आला होता, असे शिवानंदन यांनी आठवले. मात्र अशा परिस्थितीत अधिकारी म्हणून आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहणे आणि दबाव न झुकता काम करणे हेच योग्य ठरते, असेही ते म्हणाले. “लोकशाहीत कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही पोलीसांची जबाबदारी आहे. राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडता ठाम भूमिका घेणे गरजेचे आहे. अंजना कृष्णा यांनी दाखवलेले धैर्य ही पोलीस सेवेच्या सन्मानाची बाब आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
advertisement

प्रकरणाकडे राज्याचं लक्ष

अजित पवार आणि अंजना कृष्णा यांच्या संवादामुळे निर्माण झालेली चर्चा आता राजकीय वर्तुळाबरोबरच पोलीस दलातही रंगू लागली आहे. शिवानंदन यांची प्रतिक्रिया या चर्चेला नवा पैलू देणारी ठरली आहे. त्यांनी दिलेले समर्थन अंजना कृष्णा यांना नैतिक बळ देणारे मानले जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आणि त्यातून होणारी कारवाई याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादांना नडणाऱ्या अंजना कृष्णांची आता अग्निपरीक्षा, माजी पोलीस आयुक्त असं का म्हणाले?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement