६ महिन्याआधी पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा टराटरा फाडला, रश्मी शुक्लांची जागा घेणारे सदानंद दाते कोण आहेत?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
IPS Sadanand Date: नव्या पोलीस महासंचालकांची नियुक्ती करण्यासाठी राज्य सरकारने केंद्रीय लोकसेवा आयोगाला काही नावांची यादी पाठविली असून त्यात सर्वात वरिष्ठ अधिकारी म्हणून दाते यांचा नावाचा समावेश आहे.
मुंबई : ज्येष्ठ आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) प्रमुख सदानंद दाते हे महाराष्ट्राचे राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून सूत्रे हातात घेतील, असे वृत्त आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दिलेला वाढीव २ वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने त्यांची जागा दाते घेणार असल्याचे कळते.
नव्या पोलीस महासंचालकांची नियुक्ती करण्यासाठी राज्य सरकारने केंद्रीय लोकसेवा आयोगाला काही नावांची यादी पाठविली असून त्यात सर्वात वरिष्ठ अधिकारी म्हणून दाते यांचा नावाचा समावेश आहे.
सदानंद दाते हे केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यांना पुन्हा राज्यात पाठवावे, अशी विनंती राज्य सरकारने केंद्राला केल्याचे कळते. सदानंद दाते यांच्याकडे सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) प्रमुखपद आहे.
advertisement
कोण आहेत सदानंद दाते?
सदानंद दाते हे १९९० च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी आहेत. पोलीस सेवेत जवळपास ३२ वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. आतापर्यंत अनेक हायप्रोफाईल प्रकरणे त्यांनी हाताळली आहेत. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचे सदानंत दाते यांच्या तपासातून समोर आले. यानिमित्ताने पाकिस्तानी दहशतवादाचा बुरखा त्यांनी पुन्हा टराटरा फाडला.
advertisement
तसेच मुंबईवरील २६/११ हल्ल्यावेळीही सदानंद दाते यांनी दाखवलेल्या शौर्याची संपूर्ण देशाने दखल घेतली होती. कामा हॉस्पिटलमध्ये हल्ला होत असताना त्यांनी शेकडो रुग्णांचे केलेले बचावकार्य आणि त्यावेळी बजावलेली भूमिका मुंबईकरांच्या कायम स्मरणात राहील. तहव्वूर राणा चौकशी प्रकरणातही सदानंद दाते यांची भूमिका महत्त्वाची राहिली.
सदानंद दाते हे अतिशय सर्वसामान्य कुटुंबात आले आहेत. त्यांचे वडील वर्तमानपत्र विकून घर संसार चालवायचे. अतिशय गरिबीच्या परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेऊन यूपीएससीचा अभ्यास केला आणि उत्तीर्ण झाले. पोलीस सेवेतील उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 04, 2025 9:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
६ महिन्याआधी पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा टराटरा फाडला, रश्मी शुक्लांची जागा घेणारे सदानंद दाते कोण आहेत?


