JDCC Bank Bharti 2025: जळगांव डीसीसी बँकेत 220 जागांसाठी नोकरभरती! अर्जाची लिंक बातमीत, जाणून घ्या पात्रता
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
DCC Bank Bharti 2025: जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांच्या 220 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये कारकून म्हणजेच लिपिक किंवा सपोर्ट स्टाफ या पदांचा समावेश आहे.
जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांच्या 220 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये कारकून म्हणजेच लिपिक किंवा सपोर्ट स्टाफ या पदांचा समावेश आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2025 असून, ऑनलाइन परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीद्वारे निवड केली जाईल. अलीकडेच, जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कारकून विभागामध्ये असणाऱ्या 220 रिक्त जागा भरण्याची घोषणा केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइट्स https://jdccbank.com/en/careers.php या वेबसाईटवर जाऊन अर्जदारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
वेबसाईटवर अर्ज भरण्यासाठी 19 ऑक्टोबर 2025 पासून सुरूवात झाली असून शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत आहे. https://jalgaondcc.com/ या वेबसाईटवर जाऊन अर्जदारांना आपला अर्ज भरायचा आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना त्यांचा ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक आणि आधारकार्ड क्रमांक अचुक भरणे आवश्यक आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना कोणत्या पदासाठी अर्ज भरत आहे, अर्ज भरत असलेल्या पदासाठी आपण पात्र आहोत का? याची खात्री करुनच अर्ज भरावा. भरती प्रक्रियेदरम्यान बँकेच्या संकेत स्थळावर वेळोवेळी अवलोकन करून भरती प्रक्रियेची अद्ययावत माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी उमेदवारांची राहिल.
advertisement
अर्ज भरण्याची शेवटची तारीख आणि अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख एकच असणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या वेळी शेवटच्या टप्प्यामध्ये परीक्षा शुल्क ऑनलाईन भरल्यानंतरच रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल, याची अर्जदारांनी नोंद घ्यावी. तसेच परिक्षा शुल्क ऑनलाईन स्विकारले जाईल. सदरचे परिक्षा शुल्क कोणत्याही परिस्थीतीत परत केले जाणार नाही. कारकून (सपोर्ट स्टाफ) पदासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. त्या पदवी परीक्षेमध्ये अर्जदाराने किमान 50% किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण व्हायला हवा. MSCIT किंवा शासन मान्य संस्थेतून संगणकातील सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण झालेला असावा.
advertisement
मात्र कोणत्याही शाखेतून बी.ई., बी.एस.सी. (संगणक) आणि कृषी पदवी धारक उमेदवारांसाठी सदरची अट शिथील राहील. कारकून विभागामध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदारांचे किमान वय 21 वय असावे आणि कमाल वय 35 वर्षे पूर्ण आहे, अशी वयोमर्यादा आहे. उमेदवार अर्ज करेल त्या रोजी उपरोक्त वयोमर्यादा आणि शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. उपरोक्त पदाची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परिविक्षाधीन कालावधी, वेतन, निवड पद्धती, अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज भरण्याची पद्धत आणि परिक्षा शुल्क इ. बाबतची विस्तृत जाहिरातीची PDF एकदा आवश्य वाचा. जाहिरातीच्या PDF ची लिंक बातमीमध्ये देण्यात आली आहे. काही कायदेशीर बाब उदद्भवल्यास जळगांव न्यायालयाच्या कक्षेत सोडविण्यात येईल. सदरची भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर स्थगित किंवा रद्द करण्याचे अधिकार सर्वस्वी बँकेस राहतील.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
October 19, 2025 3:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
JDCC Bank Bharti 2025: जळगांव डीसीसी बँकेत 220 जागांसाठी नोकरभरती! अर्जाची लिंक बातमीत, जाणून घ्या पात्रता