Chandrakant Patil : भूसंपादनात सत्ताधारी आमदाराची जमीन दुसऱ्याच्या नावावर, जलसमाधी घेण्याचा दिला इशारा

Last Updated:

Jalgaon News : भूसंपादनात शेतकऱ्यांची जमीन दुसऱ्याच्या नावावर दाखवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याचा फटका आमदार चंद्रकांत पाटलांनाही बसला आहे. त्यांनी आता या प्रकरणी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.

भूसंपादनात सत्ताधारी आमदाराची जमीन दुसऱ्याच्या नावावर,  जलसमाधी घेण्याचा इशारा
भूसंपादनात सत्ताधारी आमदाराची जमीन दुसऱ्याच्या नावावर, जलसमाधी घेण्याचा इशारा
विजय वाघमारे, प्रतिनिधी, जळगाव: इंदूर हैदराबाद महामार्गाच्या कामासाठी शेत जमीन भूसंपादनात मोठा गोंधळ होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. भूसंपादनात शेतकऱ्यांवर अन्याय होत असून सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने नाही अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. भूसंपादनात शेतकऱ्यांची जमीन दुसऱ्याच्या नावावर दाखवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याचा फटका आमदार चंद्रकांत पाटलांनाही बसला आहे. त्यांनी आता या प्रकरणी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.
जळगावमधील मुक्ताईनगर तालुक्यातून जाणाऱ्या इंदूर हैदराबाद महामार्गाच्या कामासाठी शेत जमीन भूसंपादनात मोठा गोंधळ होत असल्याचा आमदार चंद्रकांत पाटलांनी आरोप केला आहे. भूसंपादनात आपली जमीनही दुसऱ्याच्या नावाने दाखवण्यात आल्याचा खळबळजनक दावा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. या प्रकल्पासाठीच्या जमीन हस्तांतराच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना अत्यल्प दर दिला जात असल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी दिला आहे. शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास 13 फेब्रुवारी रोजी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देत आमदार चंद्रकांत पाटलांनी प्रशासनासह अप्रत्यक्ष सरकारला इशारा दिला आहे.
advertisement

प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग?

इंदूर हैदराबाद महामार्गासाठी केल्या जात असलेल्या भूसंपादनात सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असून सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने नसल्याचे म्हणत शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील त्यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातून जाणाऱ्या इंदोर हैदराबाद महामार्गाच्या कामासाठी शेत जमीन भूसंपादनात मोठा गोंधळ होत असून आपल्या नावाने असलेली जमीन भूसंपादनात दुसऱ्याच्या नावावर दाखवण्यात आल्याचा खळबळजनक दावाही आमदार चंद्रकांत पाटलांनी पत्रकार परिषदेत केला आहे. जमिनी हस्तांतराच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला दिला जात असून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हेतू पुरस्सर केल्या जात असल्याचा संशय ही आमदार चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला आहे .
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Chandrakant Patil : भूसंपादनात सत्ताधारी आमदाराची जमीन दुसऱ्याच्या नावावर, जलसमाधी घेण्याचा दिला इशारा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement