Jalgaon News : आवडत्या शिक्षकाची बदली अन् विद्यार्थ्यांनी रडून रडून हाल केले, भावूक करणारा VIDEO समोर
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
जळगावच्या एरंडोल तालुक्यातील फरकांडे शाळेतील शिक्षकांची झाली होती. त्यामुळे या शिक्षकांचा आज शेवटचा दिवस होता.त्यामुळे शिक्षकांच्या निरोप समारंभाच्या दिवशी विद्यार्थ्यांसह पालकांच्या डोळ्यात अश्रू आले होते.
Jalgaon News : नितीन नांदुरकर, प्रतिनिधी जळगाव : राज्यभरात सध्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची बदलीचे सत्र सूरू आहे. या बदलीमुळे अनेक वर्ष विद्यार्थ्यांना शिकवणी देणाऱ्या शिक्षकांना शाळा सोडून दुसऱ्या ठिकाणी शिकवणीस जावे लागत आहे.अशीच बदली जळगावच्या एरंडोल तालुक्यातील फरकांडे शाळेतील शिक्षकांची झाली होती. त्यामुळे या शिक्षकांचा आज शेवटचा दिवस होता.त्यामुळे शिक्षकांच्या निरोप समारंभाच्या दिवशी विद्यार्थ्यांसह पालकांच्या डोळ्यात अश्रू आले होते.त्यामुळे शाळेत भावूक वातावरण बनले होते.
एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सतीश चव्हाण तसेच उपशिक्षक विजय पाटील आणि अनिल पाटील यांची नुकतीच बदली झाली.या तिघा शिक्षकांचा निरोप समारंभ नुकताच शाळेत पार पडला होता. यावेळी शाळेतील विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले.
गेल्या अनेक वर्षांपासून शाळेत कार्यरत असलेले हे शिक्षक विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याने वागत होते.केवळ अध्यापनच नव्हे तर शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी केलेल्या त्यांच्या परिश्रमांचे कौतुक या समारंभात सर्व स्तरांतून करण्यात आले.
advertisement
“ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये असे समर्पित शिक्षक मिळणे ही मोठी जमेची बाजू आहे.त्यांच्या मेहनतीमुळेच अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षणात उत्तम यश मिळवले आहे.अशा शिक्षकांची शाळांना नितांत गरज आहे.”निरोप समारंभात विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षकांसाठी गाणी, कविता सादर करून आपली भावना व्यक्त केली.या निरोप समारंभाचे वातावरण अतिशय हळवे झाले होते.शिक्षकांच्या डोळ्यांतही विद्यार्थ्यांविषयीचे ममत्व स्पष्टपणे दिसून येत होते.
advertisement
सर, मॅडम जाऊ नका...
वाशिम जिह्यातून एक भावनिक करणारी बातमी समोर आली आहे.यामध्ये बदली झालेल्या शिक्षकांना रोखण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेचा गेट बंद केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे यावेळी विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी देखील आले होते. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील कोठारी येथील पी.एम.श्री.जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला होता.या घटनेची आता सर्वदूर चर्चा रंगली आहे. या भावनिक क्षणाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
advertisement
खरं तर ग्रामीण भागात अशा अनेक घटना घडत असतात. कारण जिल्हा परिषद शाळेत अनेक वर्ष शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देऊन घडवत असतात.त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांचा लळाच लागतो. असाच लळा वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील कोठारी येथील पी.एम.श्री.जिल्हा परिषद वरिष्ठ केंद्रातील विद्यार्थ्यांचा शिक्षकांशी लागला होता. कारण तब्बल 7 वर्षानंतर शिक्षक उमेश गहूले,संतोष मुळे आणि शिक्षिका उषा गवई यांची आज बदली झाली होती.त्यामुळे या शिक्षकांचा आजचा शेवटचा दिवस होता.त्यामुळे आपल्या आवडत्या शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
September 19, 2025 8:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon News : आवडत्या शिक्षकाची बदली अन् विद्यार्थ्यांनी रडून रडून हाल केले, भावूक करणारा VIDEO समोर