advertisement

Jalgoan Crime : जळगावची महिला अधिकारी 10 दिवस डिजीटल अरेस्ट, CBI-सुप्रीम कोर्टाची नोटीस पाठवून 25 लाख लुटले

Last Updated:

इंटरपोल, सीबीआय आणि सुप्रीम कोर्टाची बनावट नोटीस पाठवून महिला अधिकाऱ्याला 25 लाख रुपयांना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार जळगावमध्ये घडला आहे.

जळगावची महिला अधिकारी 10 दिवस डिजीटल अरेस्ट, CBI-सुप्रीम कोर्टाची नोटीस पाठवून 25 लाख लुटले (Meta AI Image)
जळगावची महिला अधिकारी 10 दिवस डिजीटल अरेस्ट, CBI-सुप्रीम कोर्टाची नोटीस पाठवून 25 लाख लुटले (Meta AI Image)
विजय वाघमारे, प्रतिनिधी
जळगाव : इंटरपोल, सीबीआय आणि सुप्रीम कोर्टाची बनावट नोटीस पाठवून महिला अधिकाऱ्याला 25 लाख रुपयांना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार जळगावमध्ये घडला आहे. या महिलेला तब्बल 10 दिवस डिजीटल अरेस्ट करण्यात आलं होतं. व्हिडिओ कॉल करून मुंबई सायबर पोलीस असल्याची बतावणी या महिला अधिकाऱ्याला करण्यात आली. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसांमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
प्रवीण कुमार, केसी सुब्रमण्यम, प्रदीप सावंत आणि संदीप राव अशी नाव सांगून सायबर ठगांनी जळगावातील एक महिला अधिकाऱ्याला वारंवार व्हॉट्सऍपवरून व्हॉईस कॉल, व्हिडिओ कॉल तसंच नॉर्मल कॉल आणि मेसेज केले. तुमच्या खात्यातून कोट्यवधींचे व्यवहार झाल्याचं सांगून त्यांना सुप्रीम कोर्ट, सीबीआय आणि इंटरपोलची बनावट नोटीसही पाठवण्यात आली.
बनावट कागदपत्र पाठवून या महिलेला अटकेची भीती दाखवण्यात आली. तसंच जीवे मारण्याची धमकी दिली गेली. या सगळ्या केसमधून बाहेर पडण्यासाठी महिलेकडे इन्सपेक्शन फीच्या नावाखाली 25 लाख रुपये एका बँकेच्या खात्यात टाकायला सांगण्यात आलं.
advertisement
तब्बल 10 दिवस या महिलेला डिजीटल अरेस्ट करण्यात आलं होतं. अखेर घाबरलेल्या महिलेने यवतमाळमध्ये जाऊन पैशांची व्यवस्था केली आणि सायबर ठगांनी सांगितलेल्या खात्यावर पैसे जमा केले. शेवटी आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर 52 वर्षांच्या महिलेने याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसात प्रवीण कुमार, केसी सुब्रमण्यम, प्रदीप सावंत आणि संदीप राव अशी नावं सांगणाऱ्या व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून जळगाव सायबर पोलीस पुढील तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgoan Crime : जळगावची महिला अधिकारी 10 दिवस डिजीटल अरेस्ट, CBI-सुप्रीम कोर्टाची नोटीस पाठवून 25 लाख लुटले
Next Article
advertisement
Gold Rate: 24 तासात सोन्याच्या दरात 'करेक्शन' येणार, बजेटमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता; तज्ज्ञांचा धक्कादायक अंदाज
24 तासात सोन्याच्या दरात 'करेक्शन' येणार, बजेटमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता
  • घरातील सोन्याबाबत उद्या होणार मोठा फैसला

  • एका निर्णयाकडे सर्वांचे डोळे

  • सोन्याच्या दागिन्यांबाबत नवा 'ट्विस्ट'

View All
advertisement