Maharashtra politics : 'तेव्हा अडीच वर्ष बिळातून बाहेर निघाला नाहीत अन् आता...'; फडणवीसांच्या निशाण्यावर पुन्हा उद्धव ठाकरे

Last Updated:

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

News18
News18
जळगाव, इम्जियाज अहमद, प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते भुसावळमध्ये बोलत होते. 'आज उद्धव ठाकरे हे जळगावला येऊन गेले, आणि म्हणाले की पाच जून येऊ द्या आम्ही भाजपवाल्यांना बिळातून बाहेर काढून मारू.  अडीच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होतात तेव्हा तुम्ही बिळातून बाहेर निघाला नाहीत, आणि आता अडीच वर्ष बिळातून बाहेर न निघणारा मुख्यमंत्री आमच्यासारख्या वाघांना मारण्यची भाषा करतो.' असा हल्लाबोल फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, 'कोरोनाच्या काळात देखील जनतेमध्ये राहणारे आम्ही लोक तुमच्यासारखे घाबरून घरी बसणारे लोक नाही आहोत. जळगावची जनता ही स्वाभिमानी जनता आहे. जळगाव व रावेरच्या लोकांना माहिती आहे की तुतारीची पिपाणी कशी करावी आणि ती ते केल्याशिवाय  राहणार नाही असा विश्वास मला असल्याचं' फडणवीस यांनी म्हटलं आहे.
advertisement
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. जळगावचे सुपुत्र उज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबई मधून उमेदवारी दिली त्यावर विरोधकांनी टीका केली. उज्वल निकम यांनी अजमल कसाबला बदनाम केलं. यांना चिंता कोणाची आहे कसाबच्या बदनामीची आहे. हे लोकं आमच्या शहिदांचा अपमान करतात. ते म्हणतात करकरेंना अजमल कसाबने गोळी मारली नाही. न्यायालयाने देखील सांगितलं की करकरेंना गोळी अजमल कसाबने मारली, अंतरराष्ट्रीय समुदायाने देखील सांगितलं की अजमल कसाबने गोळी मारली असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Maharashtra politics : 'तेव्हा अडीच वर्ष बिळातून बाहेर निघाला नाहीत अन् आता...'; फडणवीसांच्या निशाण्यावर पुन्हा उद्धव ठाकरे
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement