ऑनर किलिंगनं जळगाव हादरलं! कोयता अन् चोपरनं केले वार, कुटुंबालाही सोडलं नाही
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Honor killing in Jalgaon: जळगावातील पिंप्राळा हुडको भागात ऑनर किलिंगची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या पाच वर्षानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी आपल्या जावयाची निर्घृण हत्या केली आहे.
विजय वाघमारे, प्रतिनिधी जळगाव : जळगावातील पिंप्राळा हुडको भागात ऑनर किलिंगची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या पाच वर्षानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी आपल्या जावयाची निर्घृण हत्या केली आहे. एवढंच नव्हे तर आरोपीनं पीडित तरुणाच्या घरच्यांनाही सोडलं नाही. त्यांच्यावरही हल्ला करत गंभीर जखमी केलं आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी ऑनर किलिंगसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास केला जात आहे.
मुकेश रमेश शिरसाठ असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो जळगावातील पिंप्राळा हुडको परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होता. पाच वर्षांपूर्वी त्याने याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणीसोबत पळून जाऊन विवाह केला होता. तेव्हापासून मुलीच्या कुटुंबीयांसोबत तरुणाचा वाद सुरू होता. दरम्यान, या दाम्पत्याला तीन वर्षांची एक मुलगीही आहे. शिवाय मृत मुकेशची पत्नी दुसऱ्यांदा गर्भवती देखील आहे. दोघांचा सुखाने संसार सुरू असतानाही मुलीच्या घरच्यांचा मुकेशवरचा राग कमी झाला नाही. अखेर लग्नाच्या पाच वर्षांनी मुलीकडील कुटुंबाचा राग उफाळून आला, आरोपींनी कोयता आणि चॉपरने वार करत तरुणाचा जीव घेतला आहे.
advertisement
घटनेच्या दिवशी रविवारी सकाळी मुकेश दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर पडला होता. त्यावेळी मुलीच्या माहेरील मंडळींनी कोयता आणि चॉपरने त्याच्या मानेवर वार केला. त्यात मुकेशचा जागीच मृत्यू झाला. मुकेशची हत्या केल्यानंतर हल्लेखोरांनी मयताचा भाऊ, काका, काकू, दोन चुलत भाऊ आणि चुलत बहीण यांच्यावरही वार केले. या हल्यात मुकेशच्या घरचे जखमी झाले आहे. सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत.
advertisement
या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तरुणीचा भाऊ, काका यांच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मयत मुकेशच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी व मुलगी आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना ताब्यात घेतले आहे. परिसरात तणाव असल्यामुळे पोलिसांनी पिंप्राळा हुडको परिसरात मोठा बंदोबस्त लावला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
view commentsLocation :
Jalgaon,Maharashtra
First Published :
January 20, 2025 8:51 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
ऑनर किलिंगनं जळगाव हादरलं! कोयता अन् चोपरनं केले वार, कुटुंबालाही सोडलं नाही


