...म्हणून शिंदेंना पाठिंबा, नाहीतर सत्तेतून बाहेर पडलो असतो; बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पाठिंब्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ते जळगावमध्ये बोलत होते.
जळगाव, 17 सप्टेंबर, नितीन नांदूरकर : बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिलं म्हणून आमचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा आहे. दिव्यांग मंत्रालय दिलं नसतं तर आम्ही कधीच बाहेर पडलो असतो, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी रवी राणा यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?
बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत मोठं वक्तव्य केलं आहे. आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिलं म्हणून आमचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा आहे. दिव्यांग मंत्रालय दिलं नसतं तर आम्ही कधीच बाहेर पडलो असतो, मात्र एकनाथ शिंदे यांनी मोठी भूमिका घेतली आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत राहणं आमचं कर्तव्य आहे, आम्ही त्यांच्यासोबत राहणार असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी रवी रांणाच्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिलं आहे. बघू घोडं आणि मैदान जवळच आहे, तेव्हा कोण काय करते ते असं त्यांनी यावेळी म्हटलं.
advertisement
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी काल मराठवाड्यासाठी जाहीर झालेल्या पॅकेजवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. सभागृहात फक्त टाळ्या वाजविण्यासाठी भाषणं होतात, मते घेण्यासाठी घोषणा होतात, मात्र अंमलबजावणी होत नाही. सुधीर मुनगंटीवार यांनी शहीद स्थळांसाठी 25 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. अजित पवार यांनी देखील अनेक घोषणा केल्या, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
Sep 17, 2023 2:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
...म्हणून शिंदेंना पाठिंबा, नाहीतर सत्तेतून बाहेर पडलो असतो; बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य









