advertisement

माहूरगडला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात,जोरदार धडकेत वाहनांचा चक्काचूर; दोघांचा जागीच मृत्यू, 20 जखमी

Last Updated:

बस आणि आयशर ट्रकचा भीषण अपघात,जोरदार धडकेत वाहनांचा चक्काचूर; दोघांचा जागीच मृत्यू, 20 जखमी

News18
News18
जालना :  जालन्यात भीषण अपघाताची (Jalna Bus Accident)  घटना घडली आहे. एसटी बस आणि आयशरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहे. ही घटना नाव्हा जवळ घडली आहे. मालेगाव माहूरगड येथील बसला अपघात झाला आहे. ही धडक इतकी भीषण होती होती की बस आणि आयशर ट्रकचा चक्काचूर झाला आहे.
जालन्याजवळ एका बसला अपघात झाला आहे.आयशर ट्रक आणि बसची समोरा समोर धडक होऊन हा अपघात झाला.या अपघातात दोन प्रवासी ठार झाले असून 20 जण जखमी झाले आहेत.ही बस मालेगावहून जालना मार्गे माहूरगडला जात होती.मात्र जालन्यातील नाव्हा शिवारात आयशर ट्रक आणि बस यांचा समोरा समोर अपघात झाला

नेमकं काय घडलं?

दरम्यान हा अपघात घडताच स्थानिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून बचाव कार्य सुरू केलं.त्यामुळे जखमींना शासकीय रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे.हा अपघात इतका भीषण होता की,अपघातात आयशर आणि बसचा चक्काचूर झाला. अपघात अतिशय भीषण झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
advertisement

भीषण अपघाताच्या अनेक घटना

या मार्गावर याआधी देखील भीषण अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. या मार्गावर मधोमध डिव्हायडर नसल्यामुळे अशा अपघाताच्या घटना वारंवार घडतात. डिव्हायडर टाकले तर अपघाताचं प्रमाण कमी होण्यात मदत होईल. मात्र महामार्गावर यामध्ये मात्र कुठेही दुभाजक नसल्यामुळे वाहनं समोरासमोर येऊन धडक होऊन अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या मार्गावरही दुभाजक टाकण्याची गरज असून यामुळे अपघाताच्या घटना कमी होऊन निष्पाप जीव जाण्यापासून बचाव होईल.
advertisement

वाहतूक विस्कळीत

दरम्यान, बचाव कार्यात मदत करण्यासाठी आणि रुग्णवाहिकेद्वारे जखमींना घेऊन जाण्यासाठी पोलीस आणि वाहतूक युनिट तातडीने घटनास्थळी पोहोचले. या धडकेमुळे दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन जालना-वडीगोद्री रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
माहूरगडला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात,जोरदार धडकेत वाहनांचा चक्काचूर; दोघांचा जागीच मृत्यू, 20 जखमी
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement