Jalna News : तहसील कार्यालयातच भाजप नेत्याच्या मुलाची काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण; प्रशासनाची धावपळ

Last Updated:

Jalna News : भाजप माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष लोखंडे यांचे सुपुत्र सागर लोखंडे याने तक्रारदार प्रमोद फदाड यांना बेदम मारहाण केली.

News18
News18
जालना, (रवी जैस्वाल, प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवेगळ्या प्रकारची गुन्हेगारी वाढल्याचं चित्र आहे. किरकोळ कारणातून थेट जीव घेण्यापर्यंतच्या घटना घडल्यात. तर कुठे राजकीय वैमनस्यातूनही घटना घडत आहे. अशीच एक घटना जालना येथून समोर आली आहे. काँग्रेस कार्यकर्त्याने तक्रार केल्याने भाजप पदाधिकाऱ्याने त्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे.
भाजप कार्यकर्त्याची युवक काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण
जालन्यातील जाफराबाद तहसील कार्यालयामध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याला भाजपच्या युवक कार्यकर्त्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. प्रमोद फदाड असं मारहाण झालेल्या युवकाचं नाव आहेत. प्रमोद फदाड यांनी भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष लोखंडे यांच्या क्रेशर मशिन विरोधात तहसील कार्यालयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संतोष लोखंडे यांचे पूत्र सागर लोखंडे यांनी तक्रारदार प्रमोद फदाड यांना तहसील कार्यालयातच मारहाण केली आहे. दरम्यान याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलिसात अद्याप तक्रार दाखल नाहीये.
view comments
मराठी बातम्या/जालना/
Jalna News : तहसील कार्यालयातच भाजप नेत्याच्या मुलाची काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण; प्रशासनाची धावपळ
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement