आजपासून धावणार जालना- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस; गाडीची वेळ, थांबे, मार्ग, तिकीटाचे दर सर्व काही जाणून घ्या एका क्लिकवर
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
मराठवाड्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे, मराठवाड्यात वंदे भारत एक्स्प्रेसचं आगमन झालं असून, आजपासून ही रेल्वे जालना ते मुंबई अशी धावणार आहे.
जालना, 30 डिसेंबर, रवी जैस्वाल : मराठवाड्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे, मराठवाड्यात वंदे भारत एक्स्प्रेसचं आगमन झालं असून, आजपासून ही रेल्वे जालना ते मुंबई अशी धावणार आहे. या ट्रेनला एकूण आठ डबे असणार आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं या ट्रेनचं लोकार्पण होणार आहे. त्यानंतर ही ट्रेन जालन्याहून मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहे.
लोकार्पणाच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली आहे, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ट्रेनचं ऑनलाईन लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. रेल्वे प्रशासनाच्या वतीनं या कार्यक्रमासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व जिल्ह्यातील सर्व आमदारांना निमंत्रित करण्यात आलं आहे. रेल्वेचे महाव्यवस्थापक अरुण कुमार जैन यांनी जालना रेल्वे स्थानकाची पाहणी करत तयारीचा आढावा घेतला आहे.
advertisement
जालन्याहून मुंबईसाठी सुरू होणाऱ्या या ट्रेनची मनमाड ते जालना अशी ट्रायल रन घेण्यात आली. या मार्गावर ही रेल्वे ताशी शंभरच्या स्पीडनं धावली. ही ट्रायल यशस्वी झाली आहे. ट्रायल यशस्वी झाल्यानंतर आता या मार्गावरून ही ट्रेन धावणार आहे. वंदे भारतमुळे या भागातील प्रवाशांची मोठी सोय होणार असून, प्रवास अधिक गतिमान होणार आहे. ही ट्रेन जालन्यावरून पहाटे 5: 5 वाजता सुटणार असून, मुंबई सीएसएमटीला ती दुपारी 11: 55 ला पोहोचणार आहे. जालना ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, ठाणे आणि दादर या ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. या ट्रेनसाठी तिकीटाचे दर 900 ते 1200 च्या आसपास असण्याची शक्यता आहे.
advertisement
दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसच्या लोकार्पण सोहळ्याला छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. यामुळे इम्तियाज जलील चांगलेच आक्रमक झाले आहेत. मला आमंत्रण मिळालं नाही म्हणून मी माझा दणका दाखवणार, असा इशारा इम्तियाज जलील यांनी रेल्वेमंत्र्यांना दिला आहे. आमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यामुळे इम्तियाज जलील चांगलेच संतापले. जिथून रेल्वे जाणार नाही, तिथल्या लोकप्रतिनिधींचं नाव मात्र माझं नाव नाही, घाणेरडं राजकारण म्हणून तुम्ही आमंत्रण दिलं नाही, सुरूवात तुम्ही केली, शेवट मी करणार, असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला आहे.
Location :
Jalna,Jalna,Maharashtra
First Published :
December 30, 2023 8:09 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
आजपासून धावणार जालना- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस; गाडीची वेळ, थांबे, मार्ग, तिकीटाचे दर सर्व काही जाणून घ्या एका क्लिकवर