Maratha Reservation: मनोज जरांगेंनी मुंबईत लढाई जिंकली, जालन्यात असा झाला जल्लोष VIDEO

Last Updated:

राज्य सरकारने मराठा आरक्षणाशी संदर्भात जीआर काढल्यानंतर मराठवाड्यातील गावागावांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

+
News18

News18

जालना: राज्य सरकारने मराठा आरक्षणाशी संदर्भात जीआर काढल्यानंतर मराठवाड्यातील गावागावांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. गावांमध्ये मिरवणुका निघत आहेत. मागील पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे मुंबई येथील आझाद मैदान येथे मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन करत होते. हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याचा शासन आदेश शासनाने काढल्यानंतर मराठवाड्यातील प्रत्येक खेडेगावांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. डीजेच्या तालावर गुलालाची उधळण करत मिरवणूक काढली जात आहे. जालन्यातील दहिफळ येथील मराठा बांधवांशी लोकल 18 ने संवाद साधला पाहुयात.
मराठा आणि कुणबी हे एकच असून वेगळी जात नाही त्यामुळे मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षणाचा लाभ द्यावा अशी आंदोलक जरांगे पाटील यांची मागणी होती. त्यांच्या अनेक मागण्यांपैकी एक असलेली हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याची महत्त्वाची मागणी राज्य सरकारने मान्य केल्यानंतर मराठवाड्यातील प्रत्येक गावामध्ये जल्लोष पाहायला मिळतोय.
advertisement
आमच्या गावामध्ये गणपती आणि गौरीच्या सणानंतर दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय. गुलाल, फटाक्यांच्या आतिषबाजी आणि डीजेच्या तालावर आम्ही सगळे जल्लोष साजरा करणार आहोत. आमच्यापैकी अनेक जण मुंबई येथे जाऊन आंदोलनात सहभागी होऊन आलो आहोत. आंदोलनाला आणखी कित्येक दिवस साथ देण्याची आमची तयारी होती. परंतु मराठा समाजाला यानिमित्ताने एक मोठं यश मिळालं आहे, फक्त राज्य सरकारने याची व्यवस्थित अंमलबजावणी करून समाजाला न्याय द्यावा, अशी भावना राजेश काळे यांनी व्यक्त केली.
advertisement
मराठा समाजाकडे पूर्वी असलेल्या शेतजमिनीचे तुकडे होऊन आता शेतजमीन काही गुंठ्यावर आली आहे त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा, उदरनिर्वाहाचा, विवाहाचा आणि नोकरीचा असे विविध प्रश्न उभे राहिले होते. कुणबी आरक्षणाचा लाभ मिळाल्यास अनेकांना सरकारी नोकरीच्या संधी वाढतील, शिक्षणामध्ये संधी मिळतील त्यामुळे राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं आम्ही सगळे स्वागत करतो, असं गणेश काळे यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/जालना/
Maratha Reservation: मनोज जरांगेंनी मुंबईत लढाई जिंकली, जालन्यात असा झाला जल्लोष VIDEO
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement