Manoj Jarange Patil : बंदुकीचा फोटो टाकला, तू बामणाचा असला तर मी...; जरांगेंची फडणवीसांवर आक्रमक टीका

Last Updated:

मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटलं की, रात्री बंदुकीचा फोटो टाकला. दम होता तर थांबायचं.

News18
News18
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानतंर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर कायद्याचा सन्मान करत आपण अंतरवालीत जात असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं. संचारबंदी उठवल्यानंतर मुंबईला जाणार असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, संचारबंदीच्या निर्णयावरून त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली. संचारबंदी का लावली? कारण काय? संचारबंदी लावली म्हणजे आम्हाला मुंबईत येऊ द्यायचं नाहीय असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला.
मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटलं की, रात्री बंदुकीचा फोटो टाकला. दम होता तर थांबायचं. आम्हाला येऊ द्यायचं नाही. हा प्रयोग रात्रीच होणार होता. मराठ्यांनी डाव यशस्वी होऊ दिला नाही. थोडं पुढं गेल्यावर होणार होता म्हणून सकाळी निघणं गरजेचं होतं. कोणाकडे काहीच साहित्य नव्हतं. फडणवीसमध्ये दम नाही, पोलिसांच्या आडून सगळं करतायत असंही जरांगे पाटील म्हणाले.
advertisement
मराठा आंदोलकांना शांततेचं आवाहन करताना जरांगे पाटील म्हणाले की, तुम्ही शांत रहा. त्याच्या किती दम होता हे मला माहितीय. सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी करावीच लागेल. फडणवीसांबद्दल नाराजीची लाट उसळेल. तुमच्याशिवाय जिल्हाधिकारी संचारबंदीचा आदेश काढू शकत नाहीत. आता विचार करूनच पुढचं पाऊल टाकावं लागणार आहे. रात्रीचा त्याचा डाव मोडला. सगळ्यांना एका विचाराने पुढं जायचं आहे. महिलांवर हात उचलायला लावणार होता. राज्यकर्त्यांना हे शोभत नाही असं म्हणत जरांगे पाटलांनी गंभीर आरोप केले.
advertisement
दम असेल तर सागर बंगल्यावर ये. तुला जातीवर आव्हान केलं होतं. तू बामणाचा असला तर मी खानदानी मराठा आहे. घरात बसून मराठ्यांच्या जीवावर मोठा झाला. सत्ता कशी येते बघतो. जनता काम केल्यावर आदर करते. फडणवीसांनी लोकांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये. मराठ्यांनी शांत रहावं असं आवाहन पुन्हा जरांगे पाटलांनी केलं.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Manoj Jarange Patil : बंदुकीचा फोटो टाकला, तू बामणाचा असला तर मी...; जरांगेंची फडणवीसांवर आक्रमक टीका
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement