advertisement

मराठवाड्यात पावसाचं थैमान! जालन्यात नदीला पूर, शेताचं झालं तळ, घरांत घुसलं पाणी! Video

Last Updated:

Jalna Rain: मराठवाड्यात गेल्या 2 दिवसांत पावसाचा जोर वाढला आहे. जालन्यात तर पावसानं कहर केला असून 3 तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याने नदीला पूर आला आहे.

+
पावसामुळे

पावसामुळे नुकसान

जालना: मागील दोन दिवसांपासून मराठवाड्यामध्ये मुसळधार पाऊस होत आहे. जालना जिल्ह्यातील परतुर, मंठा आणि घनसावंगी तालुक्यामध्ये अनेक मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील अंजलगाव शिवारामध्ये रात्री दहा वाजेच्या सुमारास झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे दाणादाण उडाली. शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.
जालना जिल्ह्यातील तीन तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरात पाणी शिरलं आहे. शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झालं असून कपाशी आणि सोयाबीनची पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे या पिकांची तात्काळ पाहणी करून पंचनामे करून योग्य ती मदत शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी आता ग्रामस्थांमधून होत आहे.
advertisement
हवामान विभागाने मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. नांदेड लातूर परभणी आणि जालना जिल्ह्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं असून परतुर तालुक्यातील केसुला नदीला पूर आल्याचे पाहायला मिळते.
मंठा तालुक्यातील वडगाव सरहद गावामध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे परिसरातून वाहणाऱ्या सरस्वती नदीला पूर आला आहे आणि या पुराचे पाणी थेट गावामध्ये शिरल्याने गावाचे जनजीवन विस्कळीत झाले. वडगाव सरहद गावामध्ये नदीची पाणी शिरल्याने गावातील किराणा दुकानात आणि नागरिकांच्या घरामध्ये देखील पाणी शिरले. सरकारने झालेल्या नुकसानाची तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ मुंजाजी रेंगे यांनी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
मराठवाड्यात पावसाचं थैमान! जालन्यात नदीला पूर, शेताचं झालं तळ, घरांत घुसलं पाणी! Video
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement