Shravan Mont: सलून व्यवसायिकांवर श्रावणात संक्रांत, ग्राहकांनी फिरवली पाठ, Video
- Published by:Vrushali Kedar
- local18
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
धार्मिक गोष्टी आणि परंपरेला मानणारे अनेक लोक श्रावण पाळतात. या महिन्यात ते दाढी व कटिंग करत नाहीत.
जालना: सध्या श्रावण हा मराठी महिना सुरू आहे. हिंदू धर्मामध्ये या महिन्याला फार धार्मिक महत्त्व आहे. या महिन्यात अनेक जण व्रतवैकल्य करतात आणि शिवभक्तीमध्ये तल्लीन होतात. श्रावण महिन्यामध्ये अनेकजण मांसाहार करत नाहीत. श्रावणामध्ये केस न कापण्याची देखील परंपरा आहे. श्रावणात अनेकजण दाढी आणि डोक्यावरचे केस कापत नसल्याने सलून व्यवसायिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. लोकल 18 टीमने याबाबत जालन्यातील सलून व्यवसायिकांशी चर्चा केली.
जालना शहरात राहणारे बालाजी तळेकर हे 2005 पासून सलून व्यवसायात आहे. श्रावण महिन्या संदर्भात बोलताना तळेकर म्हणाले की, शहरी भागामध्ये अनेक जण ऑफिसेस आणि जॉबला जात असल्याने क्लीन शेव करतात. पण, धार्मिक गोष्टी आणि परंपरेला मानणारे अनेक लोक श्रावण पाळतात. या महिन्यात ते दाढी व कटिंग करत नाहीत. ग्रामीण भागामध्ये जवळपास 80 ते 90 टक्के लोक श्रावण पाळतात.
advertisement
तळेकर यांच्या दुकानामध्ये तीन ते चार कामगार आहेत. दररोज अडीच ते तीन हजार रुपयांचा व्यवसाय होते असे. मात्र, श्रावण सुरू झाल्यापासून दररोज हजार ते बाराशे रुपयांचा व्यवसाय होतो. व्यवसायामध्ये मोठी घट आली आहे, असं सलून व्यावसायिक बालाजी तळेकर यांनी लोकल 18शी बोलताना सांगितलं.
advertisement
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सलून व्यवसायावर कोरोना काळापासून फारच परिणाम झाला आहे. 2005 ते 2019 या काळात त्यांचा सलून व्यवसाय अत्यंत चांगल्या स्थितीत होता. पण, कोरोना महामारी आल्यानंतर व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. कोरोनापासून अनेक जण घरीच दाढी कटिंग करत आहेत.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
August 02, 2025 6:55 PM IST
मराठी बातम्या/जालना/
Shravan Mont: सलून व्यवसायिकांवर श्रावणात संक्रांत, ग्राहकांनी फिरवली पाठ, Video