बाईपण भारी! ‘उमेद’ च्या महिला जालन्यातून विक्री करणार 44 उत्पादनं ऑनलाईन

Last Updated:

ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या तब्बल 44 वस्तू आणि उत्पादने या मार्टमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. त्याचबरोबर या वस्तूंची ऑनलाईन विक्री देखील करण्यात येत आहे पाहुयात काय आहे उमेदवारी संकल्पना.

+
उमेद

उमेद मार्ट मधील वस्तू व उत्पादने

नारायण काळे, प्रतिनिधी 
जालना : ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्यात उमेद अभियान राबवले जाते. या अंतर्गत ग्रामीण महिलांनी तयार केलेले खाद्यपदार्थ आणि वस्तू यांना हक्काचे व्यासपीठ मिळावं यासाठी जालना शहरांमध्ये उमेद मार्ट ही संकल्पना राबविण्यात आली आहे. 9 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा मीना यांच्या हस्ते या उमेदवाराचं उद्घाटन करण्यात आलं असून ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या तब्बल 44 वस्तू आणि उत्पादने या मार्टमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. त्याचबरोबर या वस्तूंची ऑनलाईन विक्री देखील करण्यात येत आहे पाहुयात काय आहे उमेदवारी संकल्पना.
advertisement
ग्रामीण भागातील गरिबी निर्मूलन करून महिलांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहायता गट, ग्रामसंघ, प्रभाग संघ, उत्पादक गट, शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात आल्या. याद्वारे शाश्वत उपजीविकेचे स्रोत आणि त्यांनी तयार केलेल्या वस्तू आणि उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी दोन वर्षांपूर्वी महाजीविका अभियान राबवण्यात आले.
यात जालना जिल्ह्याने बाजी मारली असून 10 हजार महिलांनी विविध प्रकारची 44 उत्पादने तयार करत त्याची उत्कृष्ट पॅकिंग करून विक्री सुरू केली. शिवाय, ऑनलाइन संकेतस्थळही सुरू करत त्यावर राज्यभरातून आलेल्या ऑर्डप्रमाणे उत्पादने घरपोच विक्री केली जात आहेत. गटांच्या उत्पादक गटांची दखल राज्यस्तरावरून घेण्यात आली असून सातारा, रत्नागिरी आणि जालना या तीन जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प हाती घेण्यात आला.
advertisement
उमेद मार्टच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना आपली वस्तू व सेवा विक्रीचे हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झाला आहे. यातून ग्रामीण भागातील महिला तसेच ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होऊन ग्रामीण भागातील दर्जेदार उत्पादने व सेवा शहरातील नागरिकांना सहज उपलब्ध होतील. या वस्तू व सेवांची ऑनलाइन विक्री देखील करण्यात येत आहे. www.umedmart.com या संकेतस्थळावरून सर्वसामान्य नागरिक या वस्तू उत्पादने ऑनलाइन देखील मागवू शकतात. सर्वसामान्य नागरिकांनी महिलांनी उत्पादित केलेल्या या वस्तू व सेवांचा लाभ घ्यावा, असं आवाहन उमेद अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक शैलेश चौधरी यांनी केलं आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
बाईपण भारी! ‘उमेद’ च्या महिला जालन्यातून विक्री करणार 44 उत्पादनं ऑनलाईन
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement