advertisement

4 कोटींची आलिशान रेंज रोव्हर, भाजप खासदाराच्या धावत्या कारने अचानक घेतला पेट, क्षणात कोळसा

Last Updated:

मुंबई-नाशिक महामार्गावर शुक्रवारी रात्री एक थरारक घटना घडली. इथं एका भाजपच्या खासदाराच्या आलिशान कारला भीषण आग लागली.

News18
News18
मुंबई-नाशिक महामार्गावर शुक्रवारी रात्री एक थरारक घटना घडली. इथं एका भाजपच्या खासदाराच्या आलिशान कारला भीषण आग लागली. ही आग एवढी तीव्र होती की, ज्यात सुमारे चार कोटींची कार जळून खाक झाली आहे. घटनास्थळी अक्षरश: केवळ राख उरली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडल्याने वेळेवर मदतही मिळाली नाही. या घटनेचे काही व्हिडीओज आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात घटनेची भीषणता स्पष्टपण दिसत आहे.
ज्या खासदाराच्या कारला आग लागली, त्या खासदारांचं नाव लुंबा रामजी चौधरी असं असून ते राजस्थानमधील जालोर-सिरोही मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. शुक्रवारी मध्यरात्री त्यांच्या धावत्या रेंज रोव्हर कारला अचानक भीषण आग लागली. सुदैवाने, कार चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे खासदार चौधरी यांच्यासह कारमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत. मात्र, या आगीत कोट्यवधी रुपयांची आलिशान रेंज रोव्हर कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
advertisement

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार लुंबा रामजी चौधरी हे वाशिम येथील दौरा आटोपून महाशिवरात्रीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जात होते. त्यांच्यासोबत त्यांचे काही सहकारीही कारमध्ये होते. शहापूर येथील चालक अनिल बबन जाधव (वय ४०) हे ही कार चालवत होते.
कार नाशिक जवळील गोंदे फाटा परिसरात आली असताना, चालक जाधव यांना अचानक गाडीतून काहीतरी जळाल्याचा उग्र वास आला. इंजिनमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच जाधव यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने कार रस्त्याच्या कडेला उभी केली.
advertisement

चालकाचे प्रसंगावधान ठरले महत्त्वाचे

आग वाढत असल्याचे पाहून चालक अनिल जाधव यांनी तातडीने खासदार चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गाडीतून खाली उतरण्यास सांगितले. सर्व प्रवासी गाडीतून सुखरूप खाली उतरल्यानंतर काही मिनिटांतच आगीने रौद्र रूप धारण केले. पाहता पाहता आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण कारला विळखा घातला. हायवेवर धावत्या कारने पेट घेतल्यामुळे काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती.
advertisement

कोट्यवधींची कार जळून खाक

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, खासदारांची आलिशान रेंज रोव्हर कार अक्षरशः कोळसा झाली आहे. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की स्थानिक अग्निशमन दलाला पाचारण करेपर्यंत गाडीचा केवळ सांगाडा शिल्लक उरला होता. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. पुढील तपास केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
4 कोटींची आलिशान रेंज रोव्हर, भाजप खासदाराच्या धावत्या कारने अचानक घेतला पेट, क्षणात कोळसा
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement