Railway Update: मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांचे होणार हाल, जनशताब्दी, तेजस एक्सप्रेसच्या मार्गात मोठा बदल, कोठे असतील थांबे?

Last Updated:

Railway Update: दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन करून कोकणात गेलेल्या काही भाविकांनी परत मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे.

Railway Update: मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांचे होणार हाल, जनशताब्दी, तेजस एक्सप्रेसच्या मार्गात मोठा बदल, कोठे असतील थांबे?
Railway Update: मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांचे होणार हाल, जनशताब्दी, तेजस एक्सप्रेसच्या मार्गात मोठा बदल, कोठे असतील थांबे?
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेल्या चाकरमान्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन करून कोकणात गेलेल्या काही भाविकांनी परत मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. मात्र, रेल्वे प्रवाशाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील (सीएसएमटी) प्लॅटफॉर्म क्रमांक 12 आणि 13 च्या विस्तारीकरणाचं काम सुरू असल्यामुळे कोकणातून मुंबईकडे येणारी 'तेजस' आणि 'जनशताब्दी एक्सप्रेस' सीएसएमटीऐवजी दादरपर्यंतच धावणार आहेत. मंगळुरू-सीएसएमटी एक्सप्रेस देखील ठाण्यापर्यंत चालवून अंशत: रद्द करण्यात येणार आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सीएसएमटी येथे सुरू असलेल्या कामामुळे कोकणातून मुंबईत परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. तेजस, जनशताब्दी आणि मंगळुरू या तिन्ही गाड्या 31 ऑगस्टपर्यंत सीएसएमटीपर्यंत येऊ शकणार नाहीत. मंगळुरू एक्सप्रेस सीएसएमटीऐवजी ठाण्यापर्यंत धावेल. त्यामुळे ठाण्यावरून सीएसएमटी गाठण्यासाठी प्रवाशांना पुन्हा लोकल किंवा पर्यायी वाहनांचा पर्याय स्वीकारावा लागेल. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागेल.
advertisement
कोकण रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 12 आणि 13 च्या विस्तारीकरणाचं कामं सुरू आहे. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवरील रेल्वे इतर प्लॅटफॉर्मवर उभ्या केल्या जातात. तर, काही प्लॅटफॉर्मअभावी काही गाड्यांचा सीएसएमटीमधील थांबा रद्द केला जातो. सध्या सुरू असलेल्या कामांमुळे गाडी क्रमांक 12134 मंगळुरू ते मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस ठाण्यापर्यंत येणार आहे. गाडी क्रमांक 22120 मडगाव ते सीएसएमटी तेजस एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक 12052 मडगाव ते सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेस दादरपर्यंत येणार आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Railway Update: मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांचे होणार हाल, जनशताब्दी, तेजस एक्सप्रेसच्या मार्गात मोठा बदल, कोठे असतील थांबे?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement