कामठीचे उदाहरण, राहुल गांधींचे मतदार संख्येवरून आरोप, काँग्रेसचे पराभूत उमेदवार म्हणतात..
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Rahul Gandhi: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या निवडणूक काळातील कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करणारा लेख लिहिला आहे.
नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतल्या निवडणूक आयोगाच्या कथित 'सामना निश्चिती'वरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षात जोरदार वार प्रतिवार सुरू आहेत. काँग्रेस नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या निवडणूक काळातील कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करणारा लेख लिहिला आहे. या लेखात विशेष करून त्यांनी कामठी विधानसभा मतदारसंघाचा उल्लेख केला आहे. या सगळ्यावर राज्यात जोरदार राजकारण तापलेले असताना कामठीच्या काँग्रेस आमदारांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
कामठीचे काँग्रेस उमेदवार सुरेश भोयर काय म्हणाले?
नागपूर जिल्ह्याचा कामठी विधानसभा मतदारसंघाबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपात सत्य आहे. विधानसभा निवडणुकीची अंतिम मतदार यादी जाहीर झाली. मतदारसंघात ३५ हजार मतदार वाढले होते. यात १२ हजार मतदार शेवटच्या तीन दिवसात वाढल्याचा आरोप विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार सुरेश भोयर यांनी निवडणूक आयोगाच्या कामावर आरोप केले.
advertisement
निवडणूक आयोगाने विधानसभेसाठी २९ ऑक्टोबर २०२४ मध्ये मतदार यादी प्रसिद्ध केली होती. त्यात २३ हजार मतदार वाढले होते. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. मतदानाच्या तीन दिवसा अगोदर पर्यंत १२ हजार मतदार ऑनलाइन नोंदणी करून वाढलेले आहे. हे मतदार कुठल्या कागदपत्रांच्या आधारे वाढले याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुरेश भोयर यांनी केली आहे.
advertisement
केवळ आयटी प्रूफच्या भरोशावर परप्रांतीय विट भट्ट्यांवर काम करणाऱ्या लोकांचे नाव ऑनलाईन मतदार यादी समाविष्ट झाले, असा गंभीर आरोप पराभूत उमेदवार सुरेश भोयर यांनी केला. आमच्या आरोपांचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले पाहिजे, अशी मागणी भोयर यांनी केली.
राहुल गांधी यांच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर
भारत निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला २४ डिसेंबर २०२४ रोजी सविस्तर उत्तर पाठवले असून, त्यात त्यांच्या उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर स्पष्ट आणि तपशीलवार स्पष्टीकरण दिले आहे. या अधिकृत पत्रव्यवहारानंतरही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांद्वारे पुन्हा शंका आणि आरोप मांडल्याने आयोगाने याबाबत खेद व्यक्त केला आहे. निवडणूक आयोग एक स्वतंत्र आणि संविधानिक संस्था आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा त्याच्या नेत्याने आयोगाशी थेट पत्राद्वारे संपर्क साधल्यास, आम्ही निश्चितच उत्तर देतो आणि देत आलो आहोत, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
June 09, 2025 6:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कामठीचे उदाहरण, राहुल गांधींचे मतदार संख्येवरून आरोप, काँग्रेसचे पराभूत उमेदवार म्हणतात..