Teacher Recruitment : खुशखबर! राज्यात होणार तब्बल 18 हजार शिक्षकांची भरती; आता या तारखेला होणार परीक्षा
Last Updated:
Teacher Vacancy Details : राज्यातील डीएड आणि बीएड धारक उमेदवारांसाठी मोठी खुशखबर आहे. शिक्षण खात्याने तब्बल 18 हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षक होऊ इच्छितांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. राज्यातील शिक्षण खात्याने तब्बल 18 हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना 7 डिसेंबर रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेला बसावे लागणार आहे. डीएड आणि बीएड धारक उमेदवार 9 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 23 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
अर्ज कुठे करता येतील?
राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त असल्याने ही मोठी भरती केली जाणार आहे. शिक्षण खात्याच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करू शकतात. वर्ष 2022 मध्ये 15 हजार शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती, ज्यामध्ये 13,352 उमेदवार पात्र ठरले होते आणि त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले होते. मात्र अजूनही काही शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने ही नवीन भरती केली जात आहे.एक महत्त्वाचे म्हणजे ही शिक्षक भरती बेळगावमधील आहे.
advertisement
1) टीईटी परीक्षा दोन सत्रात घेतली जाणार आहे ज्यात सकाळच्या सत्रात इयत्ता 1 ते 5 वी आणि दुपारच्या सत्रात इयत्ता 6 ते 8 वी साठी परीक्षा होईल.
2)सामान्य आणि ओबीसी उमेदवारांना एका परीक्षेसाठी 700 रुपये तर दोन्ही परीक्षांसाठी 1000रुपये इतके शुल्क भरावे लागेल.
3)अनुसूचित जाती-जमाती (SC/ST) उमेदवारांना एका परीक्षेसाठी 350 रुपये तर दोन्ही परीक्षांसाठी 500 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
advertisement
४)अर्ज करताना प्रवेश शुल्क भरून सर्व आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन सादर करावी लागतील. अधिक माहिती आणि परीक्षा वेळापत्रक शिक्षण खात्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे इच्छुकांनी वेळेत अर्ज करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 23, 2025 7:02 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Teacher Recruitment : खुशखबर! राज्यात होणार तब्बल 18 हजार शिक्षकांची भरती; आता या तारखेला होणार परीक्षा