Vote Jihad Part 2 : भाजप नेत्याच्या रडारवर शिंदेंचा आमदार? मतदार संघात 'व्होट जिहाद'चा आरोप
- Published by:Prashant Gomane
 
Last Updated:
राज्यात सैफ अली खान हल्लाप्रकरण चांगलंच तापलं आहे. त्यातल्या त्यात काल सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांग्लादेशी असल्याची माहिती समोर आली होती.यासंबंधित ठोस पुरावे देखील पोलिसांच्या हाती लागले होते. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बांग्लादेश रोहिंग्यांविरूद्ध आक्रमक होत मोहिम आखण्याचा इशारा दिला आहे.
Kirit Somaiya on Bangladeshi Rohingya : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला टार्गेट करण्यासाठी व्होट जिहादचा आरोप करून रान पेटवले होते. हेच आरोप आता भाजप नेत्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदाराविरूद्ध सूरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सूरू झाली आहे. विशेष म्हणजे भापज नेत्याने हे आरोप करताना व्होट जिहाद पार्ट 2 अशी मोहिम राबवण्याचाही इशारा दिलाय. त्यामुळे या इशाऱ्यानंतर आता भाजप नेत्याच्या टार्गेटवर एकनाथ शिंदे यांचा आमदार आला आहे. त्यामुळे नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर सध्या राज्यात सैफ अली खान हल्लाप्रकरण चांगलंच तापलं आहे. त्यातल्या त्यात काल सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांग्लादेशी असल्याची माहिती समोर आली होती.यासंबंधित ठोस पुरावे देखील पोलिसांच्या हाती लागले होते. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बांग्लादेश रोहिंग्यांविरूद्ध आक्रमक होत मोहिम आखण्याचा इशारा दिला आहे.
VoteJihad Part 2
Today afternoon 1pm, I am visiting SILLOD
Bangladeshi Rohingyas Birth Certificate Scam
Chhatrapati Sambhaji Nagar District including 9 tehsil have 10,068 application for Birth Certificate
of this Sillod Tehsil have 4,730 applications of Bangladeshi Rohingyas pic.twitter.com/obHqL6QQqX
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 20, 2025
advertisement
किरीट सोमय्या यांनी बांग्लादेशी मुद्याला गांभिर्याने घेत थेट व्होट जिहाद पार्ट 2 अशी मोहिम राबवण्याचा इशारा दिला आहे.त्यानुसार आज त्यांनी संभाजीनंगर जिल्ह्यातील बांग्लादेशी रोहिंग्याची जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेली एक पत्र सोशल मीडियावर शेअर केली आहे.या पत्रात संभाजीनगर जिल्ह्यात किती बांग्लादेशी रोहिंग्यांनी जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला आहे, याची तालुकानिहाय आकडेवारी आहे. या आकडेवारीनुसार संपूर्ण संभाजीनगर जिह्यातील 9 तालुक्यात तब्बल 10 हजार 68 बांग्लादेशी रोहिंग्यांनी जन्म प्रमाणपत्रांसाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
विशेष म्हणजे या 9 तालुक्यांमधील एकूण 10 हजार 68 अर्जापैकी बांग्लादेशी रोहिंग्यांच्या जन्म प्रमाणपत्रांसाठी सर्वाधिक 4 हजार 730 अर्ज हे एकट्या सिल्लोडमधून केले गेले आहेत. हा तालुका महायूतीचे आमदार अब्दुल सत्तार यांचा आहे. याच मतदारसंघात सर्वाधिक बांग्लादेशी असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. त्यामुळे सोमय्या यांनी अब्दुल सत्तार यांचे नाव न घेता बांग्लादेशी रोहिंग्यांच्या जन्म दाखल्याच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. तसेच हा व्होट जिहाद पार्ट 2 असल्याचाही आरोप सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांच्या या आरोपानंतर आता अब्दुल सत्तार टार्गेटवर आले आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 20, 2025 11:06 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Vote Jihad Part 2 : भाजप नेत्याच्या रडारवर शिंदेंचा आमदार? मतदार संघात 'व्होट जिहाद'चा आरोप


