advertisement

Kolhapur : कोल्हापूर हादरलं!दिवसाढवळ्या चाकूचे सपासप वार, हल्ल्याचा भयानक VIDEO समोर

Last Updated:

जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत जयसिंगपूरच्या गल्ली नंबर 11 मध्ये चाकु हल्ला झाल्याची घटना घडली आहे. हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणावरून झाला,याची माहिती मिळू शकली नाही.

Kolhapur crime
Kolhapur crime
Kolhapur News : ज्ञानेश्वर सोळोखे, प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत जयसिंगपूरच्या गल्ली नंबर 11 मध्ये चाकु हल्ला झाल्याची घटना घडली आहे. हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणावरून झाला,याची माहिती मिळू शकली नाही. पण या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहे. विशेष म्हणजे या हल्ल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर शहरातील गल्ली नंबर 11 येथे दोन तरुणांवर दिवसाढवळ्या चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात आकाश नामदेव नलवडे हा गंभीर तर शहारुख मुजावर हा किरकोळ जखमी झाला आहे.या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे आणि नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
advertisement
खरं तर आकाश नलवडे आणि शहारुख मुजावर हे दुपारी दोनच्या सुमारास गल्ली नंबर 11 मधील एका पानटपरीसमोर उभे असताना पुंडलिक गाडीवडर हा मोटारसायकलवर तेथे आले.यावेळी किरकोळ वाद झाला आणि अचानक आरोपींनी जवळ असणारे चाकूने हल्ला चढवला.हल्ल्यात आकाश नलवडे यांच्या दोन्ही मांडीवर तसेच हाताच्या बोटावर वार करण्यात आले असून तो गंभीर जखमी झाला आहे. तर शहारुख मुजावर याच्या मांडीवर झालेल्या वारात तो किरकोळ जखमी झाला होता. दोन्ही गटात झालेल्या वादाची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सूरू केला आहे.तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी आरोपींचा शोध सूरू केला आहे.या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kolhapur : कोल्हापूर हादरलं!दिवसाढवळ्या चाकूचे सपासप वार, हल्ल्याचा भयानक VIDEO समोर
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement