Kolhapur : पाण्याच्या वेढ्यात ऍम्ब्युलन्समध्येच डिलिव्हरी, आई वाचली, पण... जग पाहण्याआधीच बाळाचा चर्रर्र करणारा शेवट

Last Updated:

मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या बहुतेक भागांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे, त्यामुळे काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.

पाण्याच्या वेढ्यात ऍम्ब्युलन्समध्येच डिलिव्हरी, आई वाचली, पण... जग पाहण्याआधीच बाळाचा चर्रर्र करणारा शेवट
पाण्याच्या वेढ्यात ऍम्ब्युलन्समध्येच डिलिव्हरी, आई वाचली, पण... जग पाहण्याआधीच बाळाचा चर्रर्र करणारा शेवट
ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी
कोल्हापूर : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या बहुतेक भागांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे, त्यामुळे काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूरमध्ये पुराच्या पाण्यात अडकल्यामुळे गर्भवती महिलेची रुग्णवाहिकेमध्येच प्रसूती झाली. यानंतर आई बचावली असली तरी बाळाचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
गगनबावडा तालुक्यातील बोरबेट येथील 29 वर्षांच्या कल्पना आनंदा डुकरे यांना प्रसूतीसाठी गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात सकाळी 9.45 वाजता दाखल करण्यात आले, पण अपुऱ्या सुविधांमुळे त्यांना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात रेफर करण्यात आले. मुसळधार पावसामुळे गगनबावडा-कोल्हापूर रस्ता जलमय झाला.
advertisement
रस्ता बंद असल्यामुळे रुग्णवाहिकेने असळजपर्यंत प्रवास केला, पण तिथून पडवळवाडीमार्गे खोकुर्लेपर्यंत चालत नेण्यात आलं. खोकुर्ले येथे रुग्णवाहिकेमध्येच कल्पना यांची डिलिव्हरी करण्यात आली. डॉक्टर स्वप्नील आणि ड्रायव्हर सतीश कांबळे यांनी अथक प्रयत्न करून आईला वाचवले, पण दुर्दैवाने बाळाचा जीव वाचला नाही. कल्पना यांची नाजूक प्रकृती लक्षात घेता, त्यांना पुरातून वाट काढत सीपीआर रुग्णालयात सुखरूप पोहोचवण्यात आले. 108 रुग्णवाहिकेनची तत्परता कल्पना यांच्यासाठी जीवनदायी ठरली, पण ग्रामीण वैद्यकीय सुविधांच्या कमतरतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
advertisement

पूरस्थिती नियंत्रणात

कोल्हापूरात पूरस्थिती नियंत्रणात आहे, पण पूरस्थिती निर्माण झाल्यास प्रशासन सज्ज आहे अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे. काल दिवसभरात जिल्ह्यातल्या अनेक भागात अतिवृष्टीची नोंद झाला असून 24 तासात जिल्ह्यात सरासरी 66 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी धरणातून 11 हजार 500 आणि काळमवाडी धरणातून 20 हजार क्यूसेक इतका विसर्ग सुरू असून कर्नाटक मधील अलमट्टी धरणातून 1 लाख 75 हजार क्यूसेक्स इतका विसर्ग सुरु असल्याचे देखील जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. कोल्हापूर सांगली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी कर्नाटक प्रशासनासोबत सतत समन्वय सुरु असल्याचे देखील जिल्हाधिकारी येडगे यांनी स्पष्ट केलंय.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kolhapur : पाण्याच्या वेढ्यात ऍम्ब्युलन्समध्येच डिलिव्हरी, आई वाचली, पण... जग पाहण्याआधीच बाळाचा चर्रर्र करणारा शेवट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement