Kolhapur News : क्लासवरून घरी जाताना गटारात पडले, दोघे वाहून गेले, एकाचा मृत्यू, दुसऱ्या भावासोबत काय घडलं?

Last Updated:

रस्त्यावर भरलेल्या पाण्यातून वाट काढत क्लासवरून घरी जात असताना दोन सख्खे भाऊ गटारात पडल्याची घटना घडली होती. या गटारात पडल्यानंतर दोघे भाऊ वाहून गेले होते. यामधील आता एका भावाचा मृत्यू झाला आहे.

Kolhapur News
Kolhapur News
Kolhapur News : ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर सध्या मुसळधार पाऊस पडतो. या मुसळधार पावसामुळे नदी,नाले आणि रस्ते पाण्याने भरले आहे.याच रस्त्यावर भरलेल्या पाण्यातून वाट काढत क्लासवरून घरी जात असताना दोन सख्खे भाऊ गटारात पडल्याची घटना घडली होती. या गटारात पडल्यानंतर दोघे भाऊ वाहून गेले होते. यामधील आता एका भावाचा मृत्यू झाला आहे. केदार मारुती कांबळे (वय 10) असे त्याचे नाव आहे. तर याचा छोटा भाऊ बेशुद्ध आहे.त्याच्यावर रुग्णालयात उपचार सूरू आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कोल्हापूरात आज दिवसभर मुसळधार पाऊस पडतो आहे.त्यामुळे रस्ते आणि गटारे पाण्याने काटोकाट पाण्याने भरलेली आहे. या इतक्या मुसळधार पावसातही दत्त कॉलनी,रिंगरोड फुलेवाडी येथे राहणारे केदार मारुती कांबळे आणि त्याचा भाऊ जॉन मारुती कांबळे हे शिकवणीसाठी क्लासला गेले होते.त्यानंतर क्लासवरून परतत असताना गटारीचा अंदाज आला नसल्याने केदार आणि जॉन गटारात पडले होते. गटारात पडल्यानंतर दोघेही दुरपर्यंत वाहून गेले होते. या घटनेत आता मोठा भाऊ केदार याचा मृत्यू झाला तर जॉन बेशुध्द असल्याने त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सूरू आहेत.
advertisement
कोल्हापूर अग्निशामक विभागाने या दोन्ही मुलांना शोधून काढले होते.पण उपचारापूर्वीच केदारचा मृत्यू झाला होता.तर जॉन बेशुध्द अवस्थेत असल्याने त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. ही दोन्ही मुलं दत्त कॉलनी रिंगरोड फुलेवाडी येथे रहात असलेले मारुती कांबळे या सेंट्रिंग कामगाराची आहेत. या घटनेने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kolhapur News : क्लासवरून घरी जाताना गटारात पडले, दोघे वाहून गेले, एकाचा मृत्यू, दुसऱ्या भावासोबत काय घडलं?
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement