कोल्हापूरमध्ये 'ई-ऑफिस' बंधनकारक, जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश; कामकाजात येणार गती!

Last Updated:

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी दैनंदिन कामकाज 'ई-ऑफिस' प्रणालीवर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत. यामुळे...

Kolhapur News
Kolhapur News
कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना दैनंदिन कामकाज 'ई-ऑफिस' प्रणालीवर (e-office) करणे बंधनकारक असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सोमवारी दिले आहेत. प्रत्येक कार्यालयाने यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेने याआधीच 'ई-ऑफिस' प्रणाली सुरू केली असून, सर्व कार्यालयांनी गतिमान कामकाजासाठी याची अंमलबजावणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
लोकशाही दिनात जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात झालेल्या मासिक लोकशाही दिनात ते बोलत होते. या दिनात एकूण 200 अर्ज दाखल झाले. यापैकी 70 अर्ज महसूल विभागाचे, 50 अर्ज इतर विभागांचे, 30 अर्ज जिल्हा परिषदेचे आणि 18 अर्ज पोलीस विभागाचे होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह इतर विभागांचे प्रमुख आणि अर्जदार उपस्थित होते. लोकशाही दिनातील हे अर्ज प्रत्येक विभागाला तत्काळ देण्यात आले.
advertisement
अर्जांवर तातडीने कार्यवाही करा!
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व विभागांना अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. ते म्हणाले, "एका महिन्याच्या आत, संबंधित अर्जदारांना त्यांच्या अर्जाच्या कार्यवाहीचा अहवाल द्यावा." शासनाच्या 50 दिवसांच्या कृती कार्यक्रमातील सूचनांनुसार कामे करावीत, असेही त्यांनी सांगितले. 'ई-ऑफिस' आणि 'ई-गव्हर्नन्स' प्रणालीचा वापर वाढवण्यासाठी तसेच संकेतस्थळाचे कामकाज सुधारण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करावे, असेही ते म्हणाले. यासोबतच, अनुकंपावरील नियुक्त्या 17 सप्टेंबरपर्यंत पूर्ण कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या लोकशाही दिनामुळे प्रशासनात सुधारणा घडवून आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
कोल्हापूरमध्ये 'ई-ऑफिस' बंधनकारक, जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश; कामकाजात येणार गती!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement