कृष्णा-पंचगंगा रौद्र रूपात! नृसिंहवाडीतील दत्त मंदिर गेले पाण्याखाली, मूर्ती हलवली सुरक्षित ठिकाणी!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
कोल्हापूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासांत तब्बल 8 फुटांची वाढ झाली आहे. यामुळे येथील प्रसिद्ध दत्त मंदिराचा...
कोल्हापूर : श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासांत तब्बल आठ फुटांची वाढ झाली आहे. त्यामुळे येथील प्रसिद्ध दत्त मंदिराचा अर्ध्याहून अधिक भाग पाण्याखाली गेला आहे. नद्यांतील वाढलेल्या पाण्यामुळे नदीकाठचे गवतही पूर्णपणे पाण्याखाली बुडाले आहे. शिरोळहून कुरुंदवाडकडे जाणारा पूलही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
श्री दत्तांची मूर्ती हालवली
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे, तसेच धरणांमधून पाणी सोडण्यात येत असल्यामुळे कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे नृसिंहवाडीतील संगमावर असलेले संगमेश्वर मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. मुख्य मंदिरात पाणी शिरल्यामुळे श्री दत्तांच्या मूर्तीचे दर्शन आता श्री.प.प. नारायण स्वामी महाराज यांच्या मंदिरात ठेवण्यात आले आहे. तेथे त्रिकाळ पूजा नियमितपणे सुरू आहे.
advertisement
अचानक वाढलेल्या पाण्यामुळे भीतीचं वातावरण
दत्त देव संस्थानचे कर्मचारी आता मंदिर परिसरातील नदीकाठचे साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवत आहेत. कुरुंदवाड परिसरात नदीचे पाणी शेतांमध्ये शिरू लागल्यामुळे शेतकरी आपल्या मोटारी काढण्यात आणि जनावरांसाठी चारा गोळा करण्यात गुंतले आहेत. कोयना आणि राधानगरी धरणांतून सुरू असलेला विसर्ग आणि जोरदार पावसामुळे शिरोळ तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
advertisement
हे ही वाचा : पावसाचा कहर! राजाराम बंधाऱ्यातून 35 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाचा हाय अलर्ट!
हे ही वाचा : पाऊस मंदावला तरी धोका कायम! कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 29, 2025 9:20 AM IST
मराठी बातम्या/कोल्हापूर/
कृष्णा-पंचगंगा रौद्र रूपात! नृसिंहवाडीतील दत्त मंदिर गेले पाण्याखाली, मूर्ती हलवली सुरक्षित ठिकाणी!