Kolhapur Crime : पोराला Free Fire गेमचा नाद, बापानं मोबाईल खेळायला दिला अन् उडाले 500000 रुपये
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Online Game Fruad : कोल्हापुरात (Kolhapur Crime) फ्री फायर गेम खेळताना शाळकरी मुलांनी गेममधील विविध आभासी वस्तू आणि शस्त्रे खरेदी करण्यासाठी वडिलांच्या 'फोन पे' (PhonePe) खात्याचा वापर केला. त्यामुळे पाच लाख खात्यातून उडाले.
Kolhapur Free Fire Game Fruad : सध्याच्या काळात ऑनलाइन गेम्सचे वाढलेले वेड किती महागात पडू शकते, याचा प्रत्यय कोल्हापुरात एका धक्कादायक घटनेतून समोर आला आहे. फ्री फायर (Free Fire) हा ऑनलाइन गेम खेळताना सहावी आणि नववीत शिकणाऱ्या दोन मुलांनी आपल्या वडिलांच्या बँक खात्यातून तब्बल 5 लाख रुपये उडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. म्हशी खरेदीसाठी ठेवलेली ही रक्कम मुलांनी गेममधील आभासी शस्त्रे (Virtual Weapons) खरेदी करण्यासाठी वापरल्याने शेतकरी पालकाला मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी पालकांनी सायबर पोलिसांत धाव घेतली आहे.
पोरं गेम खेळत गेली अन् इतकं खातं रिकामं
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबातील दोन मुले, एक सहावीत तर दुसरा नववीत शिकणारा, 'फ्री फायर' या लोकप्रिय ऑनलाइन गेमच्या आहारी गेले होते. गेम खेळताना त्यांनी गेममधील विविध आभासी वस्तू आणि शस्त्रे खरेदी करण्यासाठी वडिलांच्या 'फोन पे' (PhonePe) खात्याचा वापर केला. वारंवार होणाऱ्या या ऑनलाइन खरेदीमुळे वडिलांच्या खात्यातून मोठी रक्कम हळूहळू कमी होत गेली.
advertisement
म्हैस घ्यायला जमा केलते 5 लाख रुपये
पालकांनी म्हशी खरेदी करण्यासाठी जमा करून ठेवलेली 5 लाख रुपयांची रक्कम खात्यातून गायब झाल्याचे लक्षात येताच त्यांना धक्का बसला. चौकशी केली असता, मुलांनी गेमसाठी ही रक्कम खर्च केल्याचे समोर आले. ऑनलाइन गेमच्या माध्यमातून होणाऱ्या अशा फसवणुकीमध्ये अनेकदा सायबर चोरट्यांचाही सहभाग असतो, जे अशा आभासी खरेदीच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहार करतात. या प्रकारामुळे पालकांना मोठा मानसिक आणि आर्थिक फटका बसला असून, त्यांनी तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली आहे.
advertisement
मुलांना पासवर्ड सांगू नका
या घटनेमुळे ऑनलाइन गेम्स आणि डिजिटल पेमेंट ॲप्सचा वापर करताना मुलांवर योग्य नियंत्रण ठेवणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. पालकांनी आपल्या बँक खात्यांचे तपशील आणि पासवर्ड मुलांपासून सुरक्षित ठेवण्याचे आवाहन सायबर तज्ञांनी केले आहे.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
July 07, 2025 11:12 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Kolhapur Crime : पोराला Free Fire गेमचा नाद, बापानं मोबाईल खेळायला दिला अन् उडाले 500000 रुपये