रोजगाराची संधी नसताना त्याने रोजगार दिला, नाशिकच्या पठ्ठ्याने अनेक महिलांना दिली पैसे कमाविण्याची संधी

Last Updated:

मेडिकल इंजीनियरिंग फिल्ड मध्ये जॉब करत असताना नाशिक च्या प्रवीण फुलदेवरे यांनी एडॉर्निया फैशन इंडिया या नावाने कंपनी स्थापन करून अनेक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. या कंपनीत महिलांसाठी कुर्ती तसेच ड्रेस हे बनविले जात असतात.

+
तुम्हाला

तुम्हाला देखिक व्यसवाय करावयाचा आहे ही आहे तुमच्यासाठी चांगली संधी.

मेडिकल इंजीनियरिंग फिल्ड मध्ये जॉब करत असताना नाशिकच्या प्रवीण फुलदेवरे यांनी 'ॲडॉर्निया फॅशन इंडिया'या नावाने कंपनी स्थापन करून अनेक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. या कंपनीत महिलांसाठी कुर्ती तसेच ड्रेस ही बनविले जात असतात. तसेच विक्री सुद्धा केले जात असतात. ही कंपनी नाशिकमध्ये सुरू झाल्याने अनेक होतकरू महिलांना आपले घर चालवण्यास मोठी मदत होत आहे. त्याना ही कल्पना कशी सुचली हे त्यांनी 'लोकल १८' च्या मध्यमातून सांगितले आहे.
प्रवीण पेशाने मेडिकल इंजिनियर आहेत आणि ते सध्या मेडिकल इक्यूपमेंट फिल्ड मध्ये जॉब करत आहे. जॉब करत असताना असे वाटले, आपण स्वतः देखील काही तरी निर्माण करावे यासाठी सतत त्यांच्या डोक्यात विचार चालत असे. या विचार करण्याच्या काळातच पुढे कोरोना महामारीने संपूर्ण जगावर हाहाकार माजवला होता. सर्वांचे व्यवसाय ठप्प झाले होते. परंतु प्रवीण यांना या काळात नवीन व्यवसाय करण्याची संधी मात्र मिळाली. मेडिकल फिल्ड मध्ये काम करत असल्याने या काळात सर्वात जास्त गरज पीपीई किटची भासत होती. दरम्यान याच काळात पीपीई किट बनविण्याची प्रवीण यांनी कंपनी स्थापित केली. या स्टार्ट अप होतकरू आणि गरजू स्त्रियांना रोजगार तर उपलब्ध झालाच पण सोबत कोविड काळात त्यांच्या संसाराला हातभार लागला.  हीच जाणीव म्हणा वा कंपनीशी जोडलेली नाळ म्हणा, ज्यांनी प्रवीण फुलदेवरे यांना प्रोत्साहित करून त्यानंतर पुढील काळात नाईटगाऊन आणि नाईट सूटचे उत्पादन समाविष्ट करण्यासाठी प्रेरित केले. 
advertisement
त्यांनी उप्तादनाविषयक महिला कामगारांना काही प्रमाणात कौशल्य विकासाचे शिक्षण देऊन आणि अ‍ॅडोर्निया फॅशन इंडियाच्या उत्पादन श्रेणीत विविधता आणली. विविधतेसोबत गुणवत्तेवरही त्यांनी विशेष भर दिला आहे. कंपनीची मूल्ये, धोरणे, गुणवत्तेची हमी, प्रयोगशीलता आणि नाविन्यपूर्ण उत्पादनांमुळे वार्षिक सरासरी ३०% वाढीचा दर आता अखंड राखला आहे. कोरोना काळात पीपीई किट बनविणारी कंपनी आज लेडीज गार्मेन्स्ट, कुर्ती तसेच ड्रेसेस बनवीत असतात. इतकेच नाही तर त्यांचा हा व्यवसाय आज गजभरात पसरलेला आहे. 'ॲडॉर्निया फॅशन इंडिया' ही कंपनी आज अनेकांना रोजगार सुद्धा देत असते. होलसेल दरात कुर्ती नाइट ड्रेसेस यांच्याकडे मिळत असल्याने अनेक महिला तसेच बचत गटातील महिला यांच्याकडून कपडे घेऊन जात असतात. या मुळे दोन पैसे सुद्धा त्याना मिळण्यास मदत मिळत असते. तुम्हाला देखील कोणाला नवीन बिझनेसची सुरवात करण्याची इच्छा असल्यास यांच्याकडून तुम्ही देखील प्रोडक्ट घेऊन व्यससाय सुरू करू शकणार आहे या करता तुम्हला त्यांच्या फॅक्टरीला भेट द्यायची असल्यास त्यांचा पत्ता: प्लाट नं.२०, श्री गणेश, पुष्पक नगर लोखंडे मळा, जेल रोड परिसरात उपलब्ध आहे. तसेच त्यांचे इन्स्टा पेज Snoozel.in या नावाने आहे या ठिकाणी तुम्हाला अधिक माहिती ही मिळून जाणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रोजगाराची संधी नसताना त्याने रोजगार दिला, नाशिकच्या पठ्ठ्याने अनेक महिलांना दिली पैसे कमाविण्याची संधी
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement