अंबाबाई जाते त्र्यंबुली देवीच्या भेटीला; का फोडला जातो कोहळा पाहा Video

Last Updated:

या सोहळ्याचे मुख्य कारण आजही कदाचित बऱ्याच जणांना ठाऊक नाही आहे.

+
News18

News18

कोल्हापूर, 20 ऑक्टोबर : दरवर्षी ललिता पंचमीला अंबाबाई देवी आणि त्र्यंबुली देवीच्या भेटीचा अलौकिक सोहळा कोल्हापूरकर याची देही याची डोळा अनुभवत असतात. देवीच्या नावाचा अखंड गजर, लवाजम्यासह पालख्या, पालखी मार्गात काढण्यात आलेल्या मोठमोठ्या रांगोळ्या, ठिकठिकाणी पालखी स्वागतासाठी उभे असलेले नागरिक हे नेहमीचे चित्र यंदाही पाहायला मिळाले. मात्र या सोहळ्याचे मुख्य कारण आजही कदाचित बऱ्याच जणांना ठाऊक नाही आहे.
का फोडला जातो कोहळा?
करवीर निवासिनी आई अंबाबाई शारदीय नवरात्रौत्सवात ललिता पंचमीला अर्थात पाचव्या माळेला आपली सखी असलेल्या त्र्यंबुली देवीच्या स्थानी तिच्या भेटीसाठी जाते. मुर्तिरुपात दोघींची भेट घडते. कुमरिकेच्या हस्ते कुष्मांड भेदन अर्थात कोहळा फोडण्याचा सोहळा पार पाडला जातो आणि पुन्हा सर्व लवाजम्यासह पालख्या या परतीच्या वाटेवर निघतात. हा प्रघात गेली कित्येक वर्षांपासून सुरू आहे. या अंबाबाई देवीच्या पालखी सोबत परंपरेप्रमाणे जुना राजवाडा येथील शिवाजी महाराज आणि तुळजाभवानी पादुका पालखी आणि गुरू महाराजांची पालखी देखील या सोहळ्यात सहभागी होत असते. याबाबत मंदिर अभ्यासक ॲड. प्रसन्न मालेकर यांनी दिली आहे.
advertisement
‘एकविरा आई तू डोंगरावरी…’ तरुणाने घरात साकारला असा देखावा की सगळे झाले अवाक्
अंबाबाई देवीने कामाक्ष दैत्याचा पराभव केला होता. तेव्हा दैत्यगुरु शुक्राचार्यांच्या मदतीने त्याने कपटाने कपिल मुनींकडून योगदंड मिळवला. हा योगदंड कोणावरुनही सरळ फिरविला असता त्याचे शेळी-मेंढीमध्ये रुपांतर होत असे आणि उलटा फिरवल्यास मूळ रूप प्राप्त होत असे. कामाक्षाने हा योगदंड सर्व देवांवरुन सरळ फिरविला. त्यामुळे त्यांचे शेळ्यामेंढ्यांमध्ये रुपांतर झाले आणि त्यांचा पराभव झाला. तेव्हा त्र्यंबुलीने चतुराई आणि चलाखीने हा योगदंड कामाक्षाकडून हस्तगत केला आणि त्याचा वध करुन सर्व देवांना पूर्ववत केले. विजयोत्सवामध्ये देव त्र्यंबुलीस आमंत्रण देण्याचे विसरुन गेले, तेव्हा ती रुसून पूर्वेकडील एका टेकडीवर जाऊन बसली. तेव्हा श्री अंबाबाई देवीने ह्या चुकीचे निराकरण करण्यासाठी त्र्यंबुली देवीकडे आपल्या सर्व लवाजम्यासह जाऊन तिची समजूत काढली आणि रागाचे शमन केले, अशी अंबाबाई देवी आणि त्र्यंबोली भेटीबाबत माहिती मालेकर यांनी सांगितली जाते.
advertisement
कोहळा फोडण्याची परंपरा
कोल्हासूर दैत्याचा वध श्री अंबाबाई देवीने केला होता. मृत्यूपूर्वी त्याने माझ्या मृत्यूच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी कूष्मांडभेद करण्यात यावा, अशी प्रार्थना केली होती. सर्व देवांनी अंबाबाई देवीला तूच प्रतिवर्षी कुमारीरुप धारण करून कूष्मांड भेद कर आणि सर्व संकटे आणि अशुभ घटकांपासून जगताचे रक्षण कर, अशी प्रार्थना केली होती. तर त्र्यंबुली देवीने क्रोधशमनानंतर अंबाबाई देवीला विनंती केली होती की, प्रतिवर्षी मुक्तीमंडपात होणारा कुष्मांडभेद सोहळा माझ्या द्वारी व्हावा, तेव्हापासून दरवर्षी शारदीय नवरात्रात पंचमीला श्री महालक्ष्मी गजारुढ होऊन श्री त्र्यंबुलीच्या भेटीस्तव लवाजम्यासह जाते आणि तिथे त्यासमयी कुमारीच्या हस्ते कूष्मांड भेद सोहळा संपन्न होतो, असेही मालेकर यांनी सांगितले.
advertisement
गंगा नदीच्या मातीतून साकारलीय दुर्गा, गरुड पुराणावर आधारित देखावा पाहिलात का?
दरम्यान हा कोहळा फोडण्याचा सोहळा पार पडल्यानंतर त्याचे तुकडे गोळा करण्यासाठी प्रचंड धडपड आणि गोंधळ या ठिकाणी दरवेळी होत असतो. यावेळी भाविकांबरोबरच पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देखील अगदी तारेवरची कसरत करावी लागते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
अंबाबाई जाते त्र्यंबुली देवीच्या भेटीला; का फोडला जातो कोहळा पाहा Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement