कोल्हापुरकरांनो, सज्ज व्हा! शुक्रवारपर्यंत 'यलो' तर शनिवारपासून 'ऑरेंज' अलर्ट, पावसाची दमदार वापसी!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने पुन्हा दमदार सुरुवात केली आहे. हवामान विभागाने शुक्रवारपर्यंत 'यलो' अलर्ट दिला असून, त्यानंतर...
कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा दमदार सुरुवात केली आहे. बुधवारी सकाळपासूनच शहरासह अनेक भागांत पावसाची रिमझिम सुरू होती. काही ठिकाणी तर जोरदार पाऊस कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी शुक्रवारपर्यंत 'यलो' अलर्ट दिला असून, शनिवार (16 ऑगस्ट) पासून 'ऑरेंज' अलर्ट जाहीर केला आहे. या काळात विशेषतः घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पूर्वेकडील तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस
गेल्या सहा-सात दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली होती. कडकडीत ऊन पडल्यामुळे ऑगस्ट महिना कोरडाच जाणार असे वाटत होते. मात्र, बुधवारी सकाळपासून वातावरणात कमालीचा बदल झाला. दिवसभर ढगाळ वातावरण होते आणि अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दुपारनंतर पूर्वेकडील तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला, तर कोल्हापूर शहराच्या काही भागांतही पावसाने दमदार हजेरी लावली. सायंकाळनंतर सर्वत्र पावसाची रिपरिप पुन्हा सुरू झाली.
advertisement
शनिवारपासून पावसाचा जोर वाढणार
सध्या दोन दिवसांसाठी 'यलो' अलर्ट जाहीर करण्यात आला असून, या काळात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. मात्र, शनिवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने विशेषतः घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 3.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये गगनबावडा तालुक्यात 26.6 मिमी, आजरा तालुक्यात 6.1 मिमी, तर शाहूवाडी तालुक्यात 5.6 मिमी पावसाची नोंद झाली. धरण क्षेत्रात पाऊस सुरू असला तरी सध्या धरणांतून विसर्ग सुरू आहे. राधानगरीतून 500 घनफूट प्रतिसेकंद, तर दूधगंगेतून 350 घनफूट प्रतिसेकंद विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीची पातळी 12.4 फुटांवर असून इचलकरंजी बंधारा पाण्याखाली गेला आहे.
advertisement
हे ही वाचा : Independence: स्वातंत्र्य लढ्याचे ऐतिहासिक साक्षीदार, मुंबईतील 5 ठिकाणं तुम्हाला माहितीये का?
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 14, 2025 6:57 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
कोल्हापुरकरांनो, सज्ज व्हा! शुक्रवारपर्यंत 'यलो' तर शनिवारपासून 'ऑरेंज' अलर्ट, पावसाची दमदार वापसी!