‘लखपती दीदी’ संकल्पना – महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाची नवी दिशा
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकार सातत्याने विविध योजना राबवत आहे. त्यातील एक महत्त्वपूर्ण संकल्पना म्हणजे ‘लखपती दीदी’.
महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकार सातत्याने विविध योजना राबवत आहे. त्यातील एक महत्त्वपूर्ण संकल्पना म्हणजे ‘लखपती दीदी’. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी १५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना या संकल्पनेची घोषणा केली.
स्वयंरोजगारासाठी नव्या संधी
या संकल्पनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या वंचित आणि बचत गटाच्या सदस्य असणाऱ्या महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित केले जात आहे. महिलांचे उत्पन्न किमान दोन स्त्रोतांवर आधारित असावे आणि वार्षिक उत्पन्न किमान एक लाख रुपये असावे, यासाठी सर्वतोपरी मदत केली जात आहे.
- स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकांकडून कर्ज मिळवण्यास मदत केली जाते.
- यामुळे महिलांना नवीन व्यवसाय सुरू करता येतो किंवा विद्यमान व्यवसाय अधिक मोठा करता येतो.
advertisement
- ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक स्वायत्तता मिळवण्याची संधी मिळते.
महाराष्ट्रातील ‘लखपती दीदी’ संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ग्राम विकास व पंचायत राज विभागाच्या ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून ही योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. महाराष्ट्रातील लाखो महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे.
- आतापर्यंत १८ लाखांहून अधिक महिला ‘लखपती दीदी’ बनल्या आहेत.
advertisement
- मार्च २०२४ पर्यंत हे संख्याशास्त्र २६ लाखांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
- या महिला शेतीपूरक व्यवसाय, गृहउद्योग, लघुउद्योग, हस्तकला, अन्नप्रक्रिया, शिलाई-भरतकाम यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत.
महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन
‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून महिलांना व्यवसायासाठी आवश्यक असलेले कौशल्यविकास आणि आर्थिक नियोजन प्रशिक्षण दिले जाते.
- बिझनेस प्लॅनिंग आणि मार्केटिंग मार्गदर्शन
advertisement
- बजेट आणि आर्थिक नियोजनाचे धडे
- सेव्हिंग आणि गुंतवणुकीची माहिती
- डिजिटल बँकिंग, मोबाईल वॉलेट आणि फोन बँकिंग प्रशिक्षण
ही संकल्पना केवळ आर्थिक मदत पुरवते असे नाही, तर महिलांना दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य आणि आत्मनिर्भरतेसाठी आवश्यक ज्ञान व प्रशिक्षण पुरवते.
‘लखपती दीदी’ संकल्पनेत सहभागी व्हा!
महिलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि स्वतःच्या आर्थिक उन्नतीसाठी पुढे यावे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या www.umed.in या संकेतस्थळाला भेट द्या आणि तुमच्या स्वप्नांना नवे पंख द्या!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 22, 2025 10:30 PM IST