Ritesh Deshmukh : लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही..! रितेश देशमुखचं भाजप प्रदेशाध्यक्षांना चोख प्रत्युत्तर, Video शेअर करत म्हणाला...
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Ritesh Deshmukh Angry On Ravindra Chavan Statement : बॉलिवूड अभिनेता आणि विलासरावांचा मुलगा रितेश देशमुख याने व्हिडीओ शेअर करत रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे.
Ravindra Chavan Statement On Vilasrao Deshmukh : भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता लातूरमधून विलासराव देशमुखांच्या (Vilasrao Deshmukh) आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं होतं. त्याच्या या वक्तव्याने लातूरमध्ये मोठा वाद पेटला असून आता महाराष्ट्रातून यावर प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. अशातच आता बॉलिवूड अभिनेता आणि विलासरावांचा मुलगा रितेश देशमुख याने व्हिडीओ शेअर करत रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे.
रितेशचं रविंद्र चव्हाण यांना चोख प्रत्युत्तर
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल लातूरमध्ये केलेल्या वक्तव्याचे आजही पडसाद उमटत आहेत. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे सुपुत्र तथा बॉलिवूड स्टार रितेश देशमुख यांनीही या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये रितेशने रविंद्र चव्हाण यांना चोख प्रत्युत्तर दिलंय.
advertisement
लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही
"दोन्ही हात जोडून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र!", असं रितेश देशमुख व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्या वक्तव्यावर केलेली ही पोस्ट आता व्हायरल होत आहे. रितेश यांचे जेष्ठ बंधू काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख यांनीही काल या वक्तव्याचा निषेध केलाय.
advertisement
advertisement
महाराष्ट्राची ही संस्कृती नाही - अमित देशमुख
लातूरमध्ये येऊन जे विधान केलंय त्यावरून, हा पक्ष कुठल्या स्तरावर राजकारणाला घेऊन चालला आहे हे दिसून येत आहे. लातूरची आणि महाराष्ट्राची ही संस्कृती नाही याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी होती. त्यांच्या विधानाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आहे. संपूर्ण महाराष्ट्रातूनही असाच निषेध होताना दिसत आहे, असं अमित देशमुख यांनी म्हटलं आहे.
advertisement
लातूर म्हणजे विलासराव देशमुख
दरम्यान, लातूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांवर एक वक्तव्य केल्यानंतर एकच खळबळ उडाली. विलासराव देशमुख हे राज्याच्या राजकारणातील मोठे नेतृत्व होतं. लातूर म्हणजे विलासराव देशमुख असं समीकरण होतं. अशातच आता लातूरमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 11:59 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
Ritesh Deshmukh : लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही..! रितेश देशमुखचं भाजप प्रदेशाध्यक्षांना चोख प्रत्युत्तर, Video शेअर करत म्हणाला...









