नाशिकच्या भरवस्तीत घुसला बिबट्या, 3 तासांपासून रेस्क्यूचा थरार, पाहण्यासाठी लोकांची गर्दी
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
बिबट्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली. नाशिकमध्ये पुन्हा एकदा बिबट्याच्या दहशतीने नागरिकांची झोप उडवली. सातपूरसारख्या गजबजलेल्या भागात भरवस्तीत बिबट्या आल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक: राज्यात एकीकडे LPG साठी लोकांनी रांगा लावल्या आहेत. दुसरीकडे खरात प्रकरणाची चर्चा सुरू असताना नाशिकमध्ये मात्र शनिवारचा दिवस बिबट्याने गाजवला. भरवस्तीमध्ये बिबट्या शिरल्याने धुमाकूळ सुरू झाला. बिबट्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली. नाशिकमध्ये पुन्हा एकदा बिबट्याच्या दहशतीने नागरिकांची झोप उडवली. सातपूरसारख्या गजबजलेल्या भागात भरवस्तीत बिबट्या आल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
नेमकं काय घडलं?
ध्रुव नगर परिसरात आज सकाळच्या सुमारास काही रहिवाशांना बिबट्या फिरताना दिसला, आधी तर डोळ्यावरच विश्वास बसेना, मात्र नंतर लक्षात आलं की आपल्याच वस्तीत बिबट्या घुसला. लोकांनी बिबट्याला पाहून आरडाओरडा सुरू केला. लोक ओरडायला लागल्याने घाबरलेल्या बिबट्याने जवळच असलेल्या घराच्या आडोशाला धाव घेतल्याचे सांगितले जात आहे. नागरी वस्तीत बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी आणि वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
advertisement
3 तासांपासून रेस्क्यू ऑपरेशनचा थरार
बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी जाळी, पिंजरा आणि रेस्क्यू किटसह ध्रुव नगरमध्ये पोहोचले आहेत. परिसरात दाट नागरी वस्ती असल्याने बिबट्याला शोधणे मोठे आव्हान ठरत आहे. तीन तासांपासून रेस्क्यू ऑपरेशनचा थरार सुरू आहे.
सध्या वनविभागाकडून ड्रोन आणि ट्रॅक कॅमेऱ्यांच्या मदतीने सर्च मोहीम राबवली जात आहे. "नागरिकांनी घाबरून न जाता घराची दारे बंद ठेवावीत आणि छतावर किंवा गॅलरीत उभे राहू नये," असे आवाहन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 2:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नाशिकच्या भरवस्तीत घुसला बिबट्या, 3 तासांपासून रेस्क्यूचा थरार, पाहण्यासाठी लोकांची गर्दी







