Krushi Market Rate: रविवारी कृषी मार्केटमध्ये शेतमालाच्या दरात उलथापालथ; सोयाबीन, कांदा आणि तुरीला किती मिळाला दर?
- Reported by:Pragati Bahurupi
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
4 जानेवारी रविवार रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये प्रमुख पिकांच्या आवक व दरांमध्ये संमिश्र चित्र पाहायला मिळाले. कपाशीची पूर्णतः आवक नसल्याने बाजारात शांतता दिसून आली. तर कांद्याच्या दरात किंचित वाढ नोंदवण्यात आली आहे.
4 जानेवारी रविवार रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये प्रमुख पिकांच्या आवक व दरांमध्ये संमिश्र चित्र पाहायला मिळाले. कपाशीची पूर्णतः आवक नसल्याने बाजारात शांतता दिसून आली. तर कांद्याच्या दरात किंचित वाढ नोंदवण्यात आली आहे. दुसरीकडे सोयाबीन आणि तुरीच्या दरात घसरण झाली आहे. पाहुयात, प्रमुख शेतमालाची आवक किती झाली? भाव किती मिळाला?
कपाशीची आवक नाही: कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजताच्या रिपोर्टनुसार, आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये कपाशीची आवक झालेली नाही.
कांद्याच्या दरात किंचित वाढ: आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये 51 हजार 656 क्विंटल कांद्याची आवक झाली. यातील पुणे मार्केटमध्ये 24 हजार 299 क्विंटल कांद्याची सर्वाधिक आवक झाली. त्याठिकाणी कांद्याला कमीतकमी 750 ते जास्तीत जास्त 1700 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. पुणे चिंचवड मार्केटमध्ये कांद्याला सर्वाधिक 2505 रुपये बाजारभाव मिळाला. शनिवारी मिळालेल्या सर्वाधिक दराच्या तुलनेत आज कांद्याच्या दरात किंचित वाढ झालेली दिसून येत आहे.
advertisement
सोयाबीनचे सर्वाधिक दरात पुन्हा घट: आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये एकूण 118 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज सोयाबीनची आवक फक्त लातूर मार्केटमध्ये झाली. त्याठिकाणी सोयाबीनला कमीत कमी 4700 ते जास्तीत जास्त 4890 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. शनिवारी मिळालेल्या सर्वाधिक दरात आज पुन्हा घट झाली आहे.
तुरीच्या दरात घट: आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये एकूण 153 क्विंटल तुरीची आवक झाली. यापैकी छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये 130 क्विंटल तुरीची आवक नोंदवण्यात आली. त्याठिकाणी तुरीला 6000 ते 6781 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. तसेच लातूर मार्केटमध्ये आलेल्या 20 क्विंटल तुरीला 7100 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक बाजार भाव मिळाला. शनिवारी मिळालेल्या दराच्या तुलनेत आज तुरीच्या सर्वाधिक दरात घट झालेली दिसून येत आहे.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
Jan 04, 2026 8:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Krushi Market Rate: रविवारी कृषी मार्केटमध्ये शेतमालाच्या दरात उलथापालथ; सोयाबीन, कांदा आणि तुरीला किती मिळाला दर?







