Satara Loksabha : 'तुतारीच्या उमेदवाराचा मुतारीत घोटाळा'; वाशी एपीएमसीतल्या आरोपांचे साताऱ्यात पडसाद

Last Updated:

साताऱ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी मिळालेले माथाडी नेते शशिकांत शिंदे आणि दुसरे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालंय.

'तुतारीच्या उमेदवाराचा मुतारीत घोटाळा'; वाशी एपीएमसीतल्या आरोपांचे साताऱ्यात पडसाद
'तुतारीच्या उमेदवाराचा मुतारीत घोटाळा'; वाशी एपीएमसीतल्या आरोपांचे साताऱ्यात पडसाद
सातारा : साताऱ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी मिळालेले माथाडी नेते शशिकांत शिंदे आणि दुसरे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालंय, त्यामुळे सातारा लोकसभा निवडणुकीमुळे वाशीतील माथाडींमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून सोमवारी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून माथाडी नेते शशिकांत शिंदेंनी उमेदवारी दाखल केली. शरद पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल होतानाच, इकडे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी एपीएमसी मार्केटमधील घोटाळ्याबाबत गंभीर आरोप केले. शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं सांगत, नरेंद्र पाटील यांनी शशिकांत शिंदेंना घेरण्याचा प्रयत्न केला.
'सातारा जिल्ह्याचा तुतारीचा उमेदवार हा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुतारीमध्ये घोटाळा करतो, हे खूप लांच्छनास्पद आहे. खूप वाईट वाटतं, अशा व्यक्तीला उमेदवारी मिळते, तर मग आम्ही पवार साहेबांना काही बोलूच शकत नाही', असा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला आहे.
खरंतर तर नरेंद्र पाटीलांनी ज्या आधारे शिंदेंवर आरोप केला, त्याला कोरेगावच्या शिवसेना आमदार महेश शिंदेंचा संदर्भ आहे. '5 लाख रुपयाला एक हजार स्क्वेअर फूटचा गाळा जो वाशी मार्केटला विकला आहे, हे मी नाही हायकोर्ट म्हणत आहे. म्हणून हायकोर्टाने यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून घेऊन हे सगळे गाळे परत घेण्याचे आणि कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत', असं महेश शिंदे म्हणाले आहेत.
advertisement
विरोधकांच्या या आरोपांना शशिकांत शिंदेंनीही प्रत्युत्तर दिलंय.. विरोधकांकडून रडीचा डाव खेळला जात असल्याचा पलटवार शशिकांत शिदेंनी केला. ऐन लोकसभा निवडणुकीत माथाडी नेत्यांनीच शशिकांत शिंदेंची कोंडी करण्याची खेळी केली आहे, त्यामुळे साताऱ्याच्या निवडणुकीवरुन सध्या वाशी एपीएमसीतील वातावरण तापल्याचं दिसतंय. जसजसा प्रचाराचा वेग येईल, तसं सातारा आणि वाशी एपीएमसीतील वातावरणही तापण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Satara Loksabha : 'तुतारीच्या उमेदवाराचा मुतारीत घोटाळा'; वाशी एपीएमसीतल्या आरोपांचे साताऱ्यात पडसाद
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement