गोगावले-जगताप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा, बंदूक सापडली, पोलिसांची पहिली प्रतिक्रिया

Last Updated:

Mahad Politics: महाडमधील शिवसेना राष्ट्रवादीमधील राड्या प्रकरणी पोलिस प्रशासनाकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

स्नेहल जगताप- भरत गोगावले
स्नेहल जगताप- भरत गोगावले
मोहन जाधव, प्रतिनिधी, रायगड (महाड) : महाड नगर पालिका निवडणुकीदरम्यान महाड शहरामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. स्नेहल जगताप आणि भरत गोगावले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता. या प्रकरणी पोलिस प्रशासनाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

गाड्यांमधून लाठ्या, काठ्या पोलिसांनी जप्त केल्या, बंदुकही सापडली

दोन्ही बाजूच्या तक्रारी आल्यानंतर महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिस तपास सुरू झाला आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या सुशांत जाबरे यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचे नुकसान झाले असून ताब्यात घेतलेल्या या गाड्यांमधून लाठ्या, काठ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तसेच पिस्टलही सापडले आहेत.
advertisement

सापडलेली बंदूक कोणती?

निवडणुकीदरम्यान हत्यार बाळगण्यावर निर्बंध आहेत. मात्र पोलिसांना सापडलेली पिस्टल जम्मु काश्मिरमध्ये नोंदणीकृत असून तिचा मालक राजस्थानचा रहिवाशी आहे. तो दोन तीन दिवसांपासून महाडमध्ये आला आहे. मात्र याची माहिती पोलिसांना नव्हती, अशी माहिती महाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी शंकर काळे यांनी दिली आहे.

24 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सदस्यांची निवडणूक 20 डिसेंबरला

advertisement
सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी आणि 76 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 154 सदस्यपदांच्या जागांसाठी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. या सर्व ठिकाणी आता 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गोगावले-जगताप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा, बंदूक सापडली, पोलिसांची पहिली प्रतिक्रिया
Next Article
advertisement
Solapur Crime: प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं, सोलापुरात खळबळ
प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने Video रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं, सो
  • प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं,

  • प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं,

  • प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं,

View All
advertisement