Maharashtra Assembly Election 2024: राज्यातील 'या' बुथवर दोन तासात एकही मतदान नाही, कारण...

Last Updated:

Maharashtra Assembly Election 2024: अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगाच्या रांगा लागल्या आहेत. एकीकडे काही मतदान केंद्रावर ही परिस्थिती असताना, दुसरीकडे काही मतदार केंद्रावर एकही मतदान झाले नाही

मतदान केंद्रावर शुकशुकाट
मतदान केंद्रावर शुकशुकाट
अविनाश कानडजे, छत्रपती संभाजीनगर : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या 288 जागांसाठी आज मतदान पार पडते आहे. त्यामुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.अशा परिस्थितीत अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगाच्या रांगा लागल्या आहेत. एकीकडे काही मतदान केंद्रावर ही परिस्थिती असताना, दुसरीकडे काही मतदार केंद्रावर एकही मतदान झाले नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या रामनगर गावातील नागरीकांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे. नेमकं या मागचं कारण काय आहे? ते जाणून घेऊयात.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या रामनगर गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. मात्र एकही ग्रामस्थ मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आला नाही. आतापर्यंत दोन तास उलटले आहे आणि एकही ग्रामस्थ मतदानासाठी आला नाही आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर शुकशुकाट आहे. दरम्यान गावात पायाभूत सुविधा नसल्यामुळे गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
advertisement
दरम्यान आज राज्यात 288 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडते आहे. तर या निवडणुकीचा निकाल हा येत्या 23 नोव्हेंबरला लागणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Assembly Election 2024: राज्यातील 'या' बुथवर दोन तासात एकही मतदान नाही, कारण...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement