Video : आधी धक्काबुक्की केली, मग कानशिलात लगावली..., शरद पवारांच्या नेत्याला बीडमध्ये बेदम चोपलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
बीडच्या परळी मतदार संघात बोगस मतदान होत असल्याची माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याला मिळाली होती.यानंतर शरद पवार गटाचे नेते माधव जाधव हे परळी मतदार संघात बोगस मतदान रोखण्यासाठी गेले होते.
बीड : परळी मतदारसंघात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या मतदार संघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याला बेदम चोपल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर आता धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप होत आहे. कारण माराहाणीनंतर कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्या नावाच्या घोषणा दिल्या होत्या.या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.
बीडच्या परळी मतदार संघात बोगस मतदान होत असल्याची माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याला मिळाली होती.यानंतर शरद पवार गटाचे नेते माधव जाधव हे परळी मतदार संघात बोगस मतदान रोखण्यासाठी गेले होते. मात्र माधव जाधव यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.
शरद पवार गटाच्या नेत्याला बेदम मारहाण pic.twitter.com/7T8OQKzFK8
— News18Lokmat (@News18lokmat) November 20, 2024
advertisement
व्हायरल व्हिडिओत तुम्ही एक अज्ञात व्यक्ती माधव जाधव यांच्या थेट आंगावर येतो आणि त्यांना धक्काबुक्की करत कानशिलात लगावतो. यानंतर इतर कार्यकर्ते देखील माधव जाधव यांना बेदम चोप देतात. त्यानंतर कार्यकर्ते माधव जाधव यांना मतदार संघातून हाकलून लावातात.
दरम्यान परळी मतदार संघात राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी अशी लढत होतेय. परळीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे.आता या मतदार संघातून कोण बाजी मारतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
November 20, 2024 2:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Video : आधी धक्काबुक्की केली, मग कानशिलात लगावली..., शरद पवारांच्या नेत्याला बीडमध्ये बेदम चोपलं


