Maharashtra Assembly Election : निकालाआधीच पाठिंब्याबाबत प्रकाश आंबेडकरांची भूमिका जाहीर, महायुती की मविआ कुणाला पाठिंबा?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
निकालाआधाीच वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी पाठिंब्याबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी नेमका महायुती की महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे? हे जाणून घेऊयात.
मुंबई : विधानसभा निवडणुकीच मतदार पार पडलं आहे. आणि उद्या शनिवारी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निकालापुर्वीच महायुती आणि महाविकास आघाडीने छोटे पक्ष आणि अपक्षांशी पाठिंब्यासाठी बोलणी सूरू केली आहे. त्यामुळे या बोलणी दरम्यान आणि निकालाआधाीच वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी पाठिंब्याबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी नेमका महायुती की महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे? हे जाणून घेऊयात.
प्रकाश आंबेडकर यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली भूमिका जाहीर केली आहे. जर उद्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला किंवा युतीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्याच्या सोबत राहू. त्यामुळे आम्ही सत्ता निवडू, असे प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केले आहे.
If VBA gets the numbers, tomorrow, to support a party or an alliance to form the government in Maharashtra, we will choose to be with one who can form the government.
We will choose power! हम सत्ता में रहना चुनेंगे!
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) November 22, 2024
advertisement
दरम्यान या सगळ्या गोष्टी उद्या येणाऱ्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. जर महायुती आणि महाविकास आघाडीपैकी कुणालाचा बहुमत गाठता आलं नाही. तर या पक्षांना छोट्या पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे ज्या आघाडीचा सत्ता स्थापणेचा दावा मजबूत असेल,त्या बाजूने प्रकाश आंबेडकर जाण्याचा अंदाज आहे.
महाविकास आघाडीला 'या' पक्षांचा पाठिंबा
advertisement
संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, प्रकाश आंबेडकर लोकशाही मानणारे नेते आहेत. त्याचे 50 ते 60 उमेदवार निवडून येत असतील तर नक्की त्यांचा आम्ही विचार करू,असे विधान करून संजय राऊतांनी त्यांना पाठिंब्याची मागणी करणार असल्याचे म्हटलं आहे. तसेच लोकसभेत आम्ही त्यांच्या सोबत राहण्याचा प्रयत्न केला विधानसभेतही केला त्यांचं असं म्हणणं आहे ज्यांची सत्ता येणार त्यांच्यासोबत राहणार आमची सत्ता येत आहेत तर ते आमच्या सोबत राहणार आहे, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.
advertisement
तसेच आमच्यासोबत डावे पक्ष आहेत,शेकाप आहे. हे सर्व महाविकास आघाडीचे घटक आहेत. तसेच काही अपक्षाने आमच्यासोबत पाठिंब्याचीही इच्छा व्यक्त केली आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत. त्याचसोबत एक्झिट पोलवर आमचा विश्वास नाही. त्यामुळे महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 22, 2024 1:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Assembly Election : निकालाआधीच पाठिंब्याबाबत प्रकाश आंबेडकरांची भूमिका जाहीर, महायुती की मविआ कुणाला पाठिंबा?


