पालघर जिल्हा विधानसभा निकाल 2024 : शिवसेना गड राखणार की धोबीपछाड होणार?
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
पालघर जिल्हा विधानसभा निकाल 2024 : पाच वर्षांच्या तुलनेत पालघर जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात कमी-अधिक फरकानं अधिक मतदान झाले.
पालघर: पालघर एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये जिल्ह्यात डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा, वसई असे सहा विधानसभा मतदारसंघ असून यामध्ये एकूण 22 लाख 92 हजार 66 मतदार आहेत.
पाच वर्षांच्या तुलनेत पालघर जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात कमी-अधिक फरकानं अधिक मतदान झाले. महायुती, महाविकास आघाडी की बहुजन विकास आघाडी यापैकी कोणाला वाढीव मतदान मिळते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले होते.
पालघर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान विक्रमगड विधानसभा मतदारसंघात झालं आहे. त्याचे कारण तेथे चुरशीची तिरंगी लढत होती. या मतदारसंघात महायुतीचे हरिश्चंद्र भोये, महाविकास आघाडीचे सुनील भुसारा आणि अपक्ष उमेदवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्यात लढत झाली.
advertisement
पालघर विधानसभा निवडणूक क्षेत्र महाराष्ट्रातील 288विधानसभा क्षेत्रांपैकी एक आहे. हे क्षेत्र पालघर जिल्ह्यात स्थित आहे आणि डहाणू तालुक्याच्या काही भागांचा त्यात समावेश आहे. पालघर क्षेत्र सौंदर्य आणि सांस्कृतिक विविधतेसाठी ओळखले जाते, जे त्याला राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण बनवते. हे क्षेत्र शिवसेनेचा गड मानला जातो, तरी शिवसेनेत फूट पडल्यानंतर यंदाच्या निवडणुकीत संधी आणि चुरस वाढली होती.
view commentsLocation :
Palghar,Thane,Maharashtra
First Published :
November 23, 2024 6:33 AM IST


