निकालाआधीच सरकार स्थापनेसाठी मविआच्या हालचाली, 'या' अपक्षांचा घेणार पाठिंबा? राऊतांनी सांगितला प्लान
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
सरकार स्थापण करण्यासाठी या आघाड्यांना अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.त्यानुसार दोन्ही आघाड्यांनी अपक्षांशी बोलणी सूरू केली आहे. महाविकास आघाडीला आता कोणत्या अपक्षांचा पाठिंबा आहे?
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच मतदान पार पडलं आहे. आता या निवडणुकीचा निकाल उद्या शनिवारी जाहीर होणार आहे. या निवडणुकीनंतर हाती आलेल्या एक्झिट पोलनुसार कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचे कळतेय.त्यामुळे सरकार स्थापण करण्यासाठी या आघाड्यांना अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.त्यानुसार दोन्ही आघाड्यांनी अपक्षांशी बोलणी सूरू केली आहे. महाविकास आघाडीला आता कोणत्या अपक्षांचा पाठिंबा आहे? कोणत्या अपक्षांशी त्यांची बोलणी सूरू आहे? याबाबतची माहिती आता संजय राऊतांनी दिली आहे.
संजय राऊत माध्यमांशी बोलत होते.यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, एक्झिट पोलवर आमचा विश्वास नाही. त्यामुळे महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकू शकते,असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे. तसेच आमच्यासोबत डावे पक्ष आहेत,शेकाप आहे. हे सर्व महाविकास आघाडीचे घटक आहेत. तसेच काही अपक्षाने आमच्यासोबत पाठिंब्याचीही इच्छा व्यक्त केला आहे.
प्रकाश आंबेडकर लोकशाही मानणारे नेते आहेत. त्याचे 50 ते 60 उमेदवार निवडून येत असतील तर नक्की त्यांचा आम्ही विचार करू,असे विधान करून संजय राऊतांनी त्यांनाही पाठिंबा देण्यासाठी विनंती करणार असल्याचे म्हटलं आहे. तसेच लोकसभेत आम्ही त्यांच्या सोबत राहण्याचा प्रयत्न केला विधानसभेतही केला त्यांचं असं म्हणणं आहे ज्यांची सत्ता येणार त्यांच्यासोबत राहणार आमची सत्ता येत आहेत तर ते आमच्या सोबत राहणार आहे, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.
advertisement
राष्ट्रपती राजवटी बद्दलचा हा भाजपचा डाव आहे उद्या निकाल लागेल आणि मग 24 25 तारखेला येथे आमदार पोहोचतील बैठका होतील विधिमंडळ पक्षाचे नेते निवडले जातील. केंद्रीय गृह मंत्रालयात भाजपाचा कारभार असल्यामुळे ते आम्हाला अडथळे आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. पण आमच्या हातात बहुमत आलं तरी राष्ट्रपती राजवटीचा प्रयत्न करतील पण आम्ही महाविकास आघाडीचा सरकार स्थापन करू सरकार स्थापन करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही,असा विश्वास देखील संजय राऊतांनी व्यक्त केला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 22, 2024 11:03 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
निकालाआधीच सरकार स्थापनेसाठी मविआच्या हालचाली, 'या' अपक्षांचा घेणार पाठिंबा? राऊतांनी सांगितला प्लान


