Maharashtra IAS : मुख्य सचिव पदाच्या शर्यतीत मोठा ट्विस्ट, केंद्राने अचानक घेतला निर्णय, IAS लॉबीमध्ये खळबळ!

Last Updated:

Maharashtra Chief Secretary : राज्याच्या प्रशासकीय विभागाची सूत्रे हाती घेण्याची इच्छा असलेल्या काही ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांचे स्वप्न अपूर्ण राहण्याची शक्यता आहे.

मुख्य सचिव पदासाठी शर्यतीत धक्कादायक ट्विस्ट! केंद्राने अचानक घेतला निर्णय, IAS लॉबीमध्ये खळबळ!
मुख्य सचिव पदासाठी शर्यतीत धक्कादायक ट्विस्ट! केंद्राने अचानक घेतला निर्णय, IAS लॉबीमध्ये खळबळ!
मुंबई : राज्याच्या प्रशासकीय विभागाची सूत्रे हाती घेण्याची इच्छा असलेल्या काही ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांचे स्वप्न अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून प्रतिनियुक्तीवर असलेल्या आयएएस अधिकाऱ्याला पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाठवले आहे. त्यांना परत पाठवल्यामुळे राज्याचे मुख्य सचिव होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
advertisement
केंद्र सरकारने बुधवारी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातील अपंग व्यक्ती विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांना महाराष्ट्रात परत पाठवले आहे. ते पुढील आठवड्यात राज्य सरकारमध्ये रुजू होतील आणि नोव्हेंबरच्या अखेरीस निवृत्त होणारे राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांच्याकडून मुख्य सचिव म्हणून सूत्रे सांभाळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
advertisement
राजेश कुमार हे १९८८ बॅचचे आयएएस अधिकारी असून, त्यांना 30 ऑगस्टला निवृत्त व्हायचे होते. मात्र, त्यांचा कार्यकाळ तीन महिन्यांनी वाढवण्यात आला होता आणि तो नोव्हेंबरअखेर संपणार आहे. कुमार यांनी या वर्षी जून महिन्यात तत्कालीन मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या निवृत्तीनंतर पदभार स्वीकारला होता.
advertisement
१९८९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले अग्रवाल हे जवळजवळ एक दशकापासून केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. या दरम्यान, त्यांनी वित्तीय सेवा, आदिवासी व्यवहार, कौशल्य विकास, पेट्रोलियम आणि समाज कल्याण यासारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये काम केले आहे. महाराष्ट्रात त्यांनी यापूर्वी अकोल्याचे जिल्हाधिकारी केले असून माहिती तंत्रज्ञान, लेखा आणि कोषागार विभागातही जबाबदारी पार पाडली आहे.
advertisement
पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणारे अग्रवाल यांनी पुढील आठवड्यात राज्य सरकारच्या सेवेत रुजू होतील. त्यांचा निवृत्तीचा कालावधी नोव्हेंबर 2026 मध्ये आहे. राज्याचे मुख्य सचिव झाल्यानंतर 1989, 1990 आणि 1991 बॅचमधील काही वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना राज्य प्रशासनाचे सर्वोच्च पद मिळण्याची संधी गमवावी लागू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra IAS : मुख्य सचिव पदाच्या शर्यतीत मोठा ट्विस्ट, केंद्राने अचानक घेतला निर्णय, IAS लॉबीमध्ये खळबळ!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement