Maharashtra CM Oath Ceremony : फडणवीसांचा आज शपथविधी; पवार, ठाकरे बंधूंना आमंत्रण, कोण राहणार उपस्थित?

Last Updated:

Maharashtra CM Oath Ceremony : देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनादेखील पाठवण्यात आले आहे. यातील कोणते नेते सहभागी होतील, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

फडणवीसांचा आज शपथविधी; पवार, ठाकरे बंधूंना आमंत्रण, कोण राहणार उपस्थित?
फडणवीसांचा आज शपथविधी; पवार, ठाकरे बंधूंना आमंत्रण, कोण राहणार उपस्थित?
मुंबई : राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. या नेतृत्वातील सरकारच्या शपथविधीस काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. तर, दुसरीकडे या शाही शपथविधीला हजर राहण्यासाठी अनेक दिग्गजांना आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना देखील या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण पाठवण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनादेखील पाठवण्यात आले आहे. यातील कोणते नेते सहभागी होतील, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर आज महायुती सरकारचा जवळपास 13 दिवसांनी शाही शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह, भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री, महायुतीचे आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय, भाजपकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांनादेखील आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत.

देवेंद्र फडणवीसांना फोन...ठाकरेदेखील येणार?

भाजप विधीमंडळ पक्षाचे गटनेते आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज असलेले देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दूरध्वनीवरून शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण दिले असल्याचे समोर आले आहे. सध्या शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे संसदेच्या अधिवेशनानिमित्ताने दिल्लीत असल्याची माहिती समोर आली आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने शपथविधीला उपस्थित राहता येणार नसल्याचं शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी कळवलं असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement

शपथविधीला ठाकरे बंधू येणार?

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दोघेही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप महायुतीला लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले आहे. आता, राज ठाकरे हे आपल्या वैयक्तिक कामामुळे आजच्या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra CM Oath Ceremony : फडणवीसांचा आज शपथविधी; पवार, ठाकरे बंधूंना आमंत्रण, कोण राहणार उपस्थित?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement