Maharashtra CM Oath Ceremony : कन्फर्म! देवेंद्र फडणवीसांसोबत आज कोण घेणार शपथ, नावे आली समोर
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra CM Oath Ceremony Devendra Fadnavis : मंत्रिमंडळावर सस्पेन्स कायम असताना महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आज देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कोण शपथ घेणार, याची माहिती समोर आली आहे.
अजित मांढरे, प्रतिनिधी, ठाणे: राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. या नेतृत्वातील सरकारच्या शपथविधीस काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. मंत्रिमंडळावर सस्पेन्स कायम असताना महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आज देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कोण शपथ घेणार, याची माहिती समोर आली आहे.
मुंबईतील आझाद मैदानावर आज महायुती सरकारचा शाही शपथविधी सोहळा होणार आहे. विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर जवळपास 14 दिवसांनी शाही शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह, भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री, महायुतीचे आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या शपथविधीमध्ये कॅबिनेट मंत्र्यांचाही शपथविधी पार पाडावा अशीदेखील काही आमदारांची इच्छा आहे. मात्र, या आमदारांची इच्छा अपूर्ण राहण्याची चिन्ह आहेत.
advertisement
आज कोण घेणार शपथ?
आजच्या शाही शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहे. त्याशिवाय उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे शपथ घेणार आहेत. या तिघांशिवाय इतर कोणाचाही मंत्री म्हणून शपथविधी पार पडणार नाही. त्यामुळे इतर आमदारांचा मंत्री म्हणून शपथविधी हा राजभवनात पार पडणार आहे. राजभवनात 7 डिसेंबर रोजी शपथविधी होणार आहे.
advertisement
मंत्रीपदाबाबत सस्पेन्स कायम...
आजच्या शपथविधीनंतर उर्वरित आमदारांचा शपथविधी हा 7 डिसेंबर रोजी राजभवनात होणार आहे. 7 डिसेंबर रोजी राजभवनात 31 आमदारांना मंत्री पदाची शपथ दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, कोणत्या पक्षाला कोणते खातं मिळणार, यावर अजूनही सस्पेन्स कायम आहे. यामुळे 7 डिसेंबरपर्यंत खात्यांबाबत महायुतीत खलबतं सुरुच राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
advertisement
शिंदे-फडणवीस यांच्यात खलबतं...
गेल्या 24 तासात देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी तीनदा वर्षा बंगल्यावर गेले. रात्री दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेत एकनाथ शिंदे यांनी आपल्या मागण्या देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडल्या. यावर देवेंद्र फडणवीसांनी आपण वरिष्ठांसोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले. मंत्री पदावरुन महायुतीत अजून ही खलबतं सुरू आहेत.गृह, अर्थ या व्यतिरिक्त काही महत्वाच्या खात्यांवरुन अजून ही चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 05, 2024 9:03 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra CM Oath Ceremony : कन्फर्म! देवेंद्र फडणवीसांसोबत आज कोण घेणार शपथ, नावे आली समोर