Maharashtra Elections 2024 : पुणे: माजी आमदाराचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, मतदानाच्या काही तास आधी खळबळ

Last Updated:

Maharashtra Assembly Elections Pune : विधानसभा निवडणुकीच्या उतरलेल्या माजी आमदाराला मोठा धक्का बसला आहे. या माजी आमदाराचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावरून हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

पुणे: माजी आमदाराचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, मतदानाच्या आधीच मोठी खळबळ
पुणे: माजी आमदाराचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, मतदानाच्या आधीच मोठी खळबळ
रायचंद शिंदे, जुन्नर, पुणे :  विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम अखेरच्या टप्प्यात आली आहे. प्रचाराच्या तोफा थंडावण्यास काही तास शिल्लक आहेत. तर, दुसरीकडे व विधानसभा निवडणुकीच्या उतरलेल्या माजी आमदाराला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदाराचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावरून हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गु्न्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
जुन्नर विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार आणि माजी आमदार शरद सोनवणे यांचा हा अश्लील व्हिडीओ असल्याचा दावा करण्यात आला आहे. अश्लील आणि चारित्र्यहनन करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. एका इंस्टाग्राम पेज वरून शरद सोनवणे यांचे अश्लील व्हिडिओ नारायणगाव आणि जुन्नर परिसरातल्या काही व्हाट्स अॅप ग्रुपवर मतदारसंघात व्हायरल झाले.
advertisement
या प्रकरणानंतर जुन्नरचं राजकारण पुन्हा एकदा रसातळाला गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. जुन्नर तालुक्यातील शरद शरद सोनवणे समर्थक महिलांनी तातडीने रात्री यावर आळेफाटा पोलीस स्टेशनवर रात्री उशिरा मोर्चा काढला. हे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांसह सूत्रधारावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. पोलिसांनी सुद्धा सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. दरम्यान शिवजन्मभूमी सारख्या राज्याला आदर्श देणाऱ्या तालुक्यात असा नीचपणा सुरू झाल्याने मोठ्या संतप्त, नाराजीच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
advertisement
दरम्यान जुन्नरमध्ये आजी-माजी आमदार एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. तर प्रमुख 5 उमेदवारांची पंचरंगी लढत याच एकमेव तालुक्यात आहे. यंदाची जुन्नरची निवडणूक अतिशय चुरशीची होणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, आता वैयक्तिक पातळीवर, चारित्र्यहनन करणारे व्हिडीओ होत असल्याने मतदारांमध्ये राजकारणाच्या खालावलेल्या प्रचाराच्या मुद्यावर संताप व्यक्त केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections 2024 : पुणे: माजी आमदाराचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, मतदानाच्या काही तास आधी खळबळ
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement