Name in Voter List: मतदार यादीत नाव आहे की नाही, तपासून घ्या, कुठे जायची आवश्यकता नाही!

Last Updated:

Maharashtra Elections 2024: लक्षात घ्या, मतदानासाठी मतदार यादीत नाव असणं आवश्यक आहे. आपलं नाव यादीत असेल तरच मतदान करता येईल. जर आपल्याकडे मतदान ओळखपत्र असेल मात्र मतदान यादीत नावच नसेल तर मतदान केंद्रात प्रवेश मिळणार नाही.

आपण एका क्लिकवर हे काम करू शकता. 
आपण एका क्लिकवर हे काम करू शकता. 
नारायण काळे, प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra assembly election 2024) सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. आपणही आपल्या मतदार ओळखपत्रासह तयारीत राहायला हवं. अनेकदा असं होतं की, नोंदणी करूनही मतदार यादीत आपलं नाव नसतं किंवा यादीत एकाच व्यक्तीची 2 नावं असतात. आपल्याबाबत असा गोंधळ टाळण्यासाठी मतदार यादीत नाव आहे की नाही हे वेळीच तपासून घ्या. याबाबत कुठे बाहेर जायची आवश्यकता नाही, आपण एका क्लिकवर हे काम करू शकता.
advertisement
भारतीय निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.eci.gov.in/ या वेबसाइटवर मतदान केंद्राबद्दल माहिती मिळू शकते. स्वत:ची डिटेल माहिती भरल्यानंतर आपल्याला आपल्या नावाबाबत माहिती दिसेल. मतदाराचं पूर्ण नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ इत्यादी भरल्यानंतर आपल्या नावाबाबत माहिती मिळू शकते. तसंच मतदार ओळख क्रमांक आणि राज्याचं नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळविण्याचा दुसरा पर्यायही संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
advertisement
लक्षात घ्या, मतदानासाठी मतदार यादीत नाव असणं आवश्यक आहे. आपलं नाव यादीत असेल तरच मतदान करता येईल. जर आपल्याकडे मतदान ओळखपत्र असेल मात्र मतदान यादीत नावच नसेल तर मतदान केंद्रात प्रवेश मिळणार नाही. भारतीय निवडणूक आयोगाचं ओळखपत्र नसेल तर पुढील आयोगानं ग्राह्य केलेल्या 11 पैकी कोणत्याही ओळखपत्राच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येतो. त्यात खालील कागदपत्रांचा समावेश आहे.
advertisement
  • पासपोर्ट
  • वाहन चालक परवाना
  • छायाचित्र असलेलं कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्रशासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे आयकार्ड)
  • छायाचित्र असलेलं बँकांचं/टपाल कार्यालयाचं पासबुक
  • पॅनकार्ड
  • राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेलं स्मार्टकार्ड
  • मनरेगा जॉबकार्ड
  • कामगार मंत्रालयानं दिलेलं आरोग्य विमा स्मार्टकार्ड
  • छायाचित्र असलेलं निवृत्तीवेतन दस्तावेज
  • खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेलं ओळखपत्र
  • आधारकार्ड
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Name in Voter List: मतदार यादीत नाव आहे की नाही, तपासून घ्या, कुठे जायची आवश्यकता नाही!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement