Maharashtra Elections : ठाकरे गटाचा सत्कार कार्यक्रम, कणकवलीत अज्ञातांकडून बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापले
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Elections Sindhudurg : ठाकरे गटाच्या एका कार्यक्रमानंतर मात्र शहरातील बॅनरबाजीने कणकवलीतील वातावरण चांगलंच तापलं आहे.
विशाल रेवडेकर, कणकवली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नाही. तर, दुसरीकडे शिवसेना शिंदे गटात आता खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तर, शिवसेना ठाकरे गटातही इनकमिंग सुरू आहे. ठाकरे गटाच्या एका कार्यक्रमानंतर मात्र शहरातील बॅनरबाजीने कणकवलीतील वातावरण चांगलंच तापलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाचा एक कार्यक्रम पार पडला. याचा संदर्भ घेत कणकवली शहरासह कणकवली तालुक्यात नांदगाव, तरेळे, कासारडे आधी ठिकाणी लावलेले बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या बॅनर वर "आजचा सत्कार, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासातील काळा दिवस" असा उल्लेख करत या बॅनरवर "श्रीधर नाईक अमर रहे" "सत्यविजय भिसे अमर रहे" असा उल्लेख केलेला आहे. "सत्यविजय भिसे आम्हाला माफ करा" असा देखील उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे.
advertisement

ठाकरे गटाच्या एका कार्यक्रमानंतर मात्र शहरातील बॅनरबाजीने कणकवलीतील वातावरण चांगलंच तापलं आहे.

ठाकरे गटाचा सत्कार कार्यक्रम, कणकवलीत अज्ञातांकडून बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापले
advertisement
या बॅनरवरील ओळीचा संदर्भ घेतला असता काल शिवसेना ठाकरे गटाकडून कणकवली भगवती मंगल कार्यालय या ठिकाणी माजी आमदार परशुराम उपरकर व माजी आमदार राजन तेली यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराचा संदर्भ या बॅनरवर घेत हे बॅनर लावण्यात आले आहेत.
यामध्ये श्रीधर नाईक हत्येच्या गुन्ह्यात त्यावेळी परशुराम उपरकर संशयित आरोपी होते. मात्र, त्यानंतर ते सदर केसमध्ये निर्दोष सुटले होते. तर सत्यविजय भिसे केसमध्ये देखील राजन तेली हे संशयित आरोपी होते. मात्र ते देखील या केसमध्ये निर्दोष सुटले होते. त्यामुळे उपरकर व तेली यांच्या सत्कारावर हा संदर्भ घेत भाष्य करणारे हे बॅनर असल्याची चर्चा कणकवलीत आहे. मात्र, हा बॅनर कोणी लावला? ते अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. कणकवली तालुक्यात नाक्यानाक्यांवर लागलेले हे बॅनर सध्या चर्चेचा विषय बनले आहेत.
view commentsLocation :
Kankavli,Sindhudurg,Maharashtra
First Published :
October 23, 2024 11:10 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections : ठाकरे गटाचा सत्कार कार्यक्रम, कणकवलीत अज्ञातांकडून बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापले


